Friday, January 27, 2023

ऋतिकने पत्नीचा पदर सोडताच पकडला सबा आजादचा हात, पाहा व्हायरल व्हिडिओ

चित्रपटसृष्टीत चर्चेत असलेले लव्हबर्ड्स ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांना अनेक प्रसंगी पब्लिक प्लेसमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. ऋतिक आणि सबा यांच्याबद्दल अलीकडेच बातम्या आल्या होत्या की, दोघेही लिव्ह-इनमध्ये राहणार आहेत आणि त्यासाठी दोघांनी मुंबईतच घर पाहिले आहे, ज्याची किंमत 100 कोटी आहे. मात्र, ऋतिकने या बातम्यांचे खंडन केले आणि अशा बातम्या बेसलेस असल्याचे म्हटले. अशातच अभिनेता त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत लंच डेटमधून बाहेर पडताना दिसला.

अभिनेता ऋतिक राेशन (hrithik roshan) आणि सबा आझाद (saba azad) या जोडप्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये हे दोघे हात धरून पब्लिकसमोर आले आहेत. मात्र, मीडियाला पाहून सबा आझाद थोडी सावध दिसली. तर, ऋतिक तिला कम्पर्टेबल करताना दिसला. ऋतिक आणि सबा दोघेही कॅज्युअल आउटफिटमध्ये हाेते. ऋतिकने स्वेटशर्ट आणि पांढऱ्या रंगाचा पँट घातलेला होता, तर सबा आझाद निळ्या रंगाच्या क्रॉप आणि जॉगर्समध्ये दिसली.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या काही काळापासून एकत्र दिसत आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून मीडियात येत आहे. मात्र, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले नाही. ऋतिक आणि सबा दोघेही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये भेटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दोघांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ऋतिक रोशन सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण आसाममध्ये झाले आहे. तर सबा आझाद दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. हा एक इन्वेस्टिगेटव-थ्रिलर वेब शो असेल, ज्याच्या स्टार कास्टमध्ये रणवीर शौरी आणि इतर अनेकांचा समावेश असेल. (bollywood actor hrithik roshan saba azad spotted holding hand in hand as they step out for lunch date)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दाक्षिणात्य सुंदरीची लाल रंगाच्या साडीमध्ये कातिलाना अदा, पाहिलेत का फोटो?
जावेद अख्तरांचं ‘मुस्लीम पर्सनल लॉ’बाबत माेठं वक्तव्य; म्हणाले, “महिलांनाही एकापेक्षा जास्त पती…”

हे देखील वाचा