शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाने अनेकांना थक्क करुन सोडलं आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने नवे विक्रम रचायला सुरुवात केली होती मात्र, प्रदर्शनानंर तर पठाणने बॉक्सऑफिसवर इतिहासच रचला आहे. भारतातच नाही तर परदेशातही पठाणला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यमुळे सर्वत्र वातावरण पठाणमय झालं आहे. एका आठवड्यातच पठाण तब्बल 600 कोटींपर्यत पोहोचला आहे. पण वर्ल्डवाईड कमाईच्या बाबतीत ‘पठाण’च्या पुढे असे काही चित्रपट आहेत ज्यांचा रेकॉर्ड अजून कोणत्याच चित्रपटाने मोडला नाही.
वादाच्या घेऱ्यातून बाहेर नघून उंच भरारी घेणारा पठाण (Pathan) चित्रपट अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधत होता. प्रदर्शनानंतर पठाणने धुमाकुळच घतला. चित्रपटाप्रती चाहत्यांचे प्रमे पाहून अनेक लोक थक्क झाले आहेत. पठाणने जगभरात 500 कोटींचा गल्ला जमवला असून भारतामध्ये 335 कोटींची कमाई केली आहे. सोमवारपर्यत जगभरात 297 कोटींचा कमाइ केली आहे तर एकूण कमाइ 542 कोटी रुपये आहे.
पठाणने बॉक्सऑफिसवर तब्बल 20 चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, त्यामध्येच ‘बाहुबली 2’ (Bahubali) चाही समावेश आहे. पठाणच्या ॲडव्हान्स बुकिंगने ‘बाहुबली 2’ चाही रेकॉर्ड मोडला. तर लवकरच जगभरात कमाईच्या बाबतीतही पठाण ‘बाहुबली 1’ लाही मागे टाकेल. पाहायला गेलं तर बाहुबली 1 ने जगभरात 599.72 कोटींची कमाइ केली होती. पण पठाणचा वाढता प्रतिसाद पाहुन असे दिसून येत आहे की, काही दिवसातच बाहुबलीचा रोकॉर्डही मोडीत काढला जाइल.
View this post on Instagram
पठाण चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून कमाइचे अंक जास्त वाटत असले तरी जगभरात कलेक्शनच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर जागा मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लाणार आहेत. कारण या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर अजूनही आमिर खान याचा ‘दंगल‘ चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात 2023.81 कोटींची कमाइ केली होती, तर त्या पाठोपाठ बाहुबली, केजीएफ 2, आरआरआर सारख्या चित्रपटांची क्रमावारी सुरु होते. पठाण या चित्रपटांनाही टक्क्टकर देऊ शकेल का? हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
चुरा लिया है तुमने जो दिल को…! रवीना टंडनचा प्रमेता पाडणारा लूक, पाहाच फोटो
चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाचा अपमान करायचा सलमान खान? खुद्द कबीर खान यांनीच केला खुलासा