Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भर गर्दित प्रियांका चाेप्रा अन् निक जाेनसने एकमेंकाना केले किस, पाहाणारे लाजून झाले लाल

बाॅलिवूडसह हाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने जगभरात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या प्रियांका तिच्या आगामी ‘सिटाडेल‘ सीरिजमुळे चर्चेत असून ती या सीरिजचे जाेरदार प्रमाेशन करत आहे. अशात आता प्रियांकाचा पती निक जाेनससाेबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही सुट्टयांचा आनंद घेताना दिसत असून भर गर्दित एकमेंकाना किस करत आहेत.

प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास (nick jonas) सध्या रोममध्ये सुट्टी साजरी करत आहेत. या व्हेकेशन दरम्यानचा एक व्हिडिओ निकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडोमध्ये दाेघेही व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास रोमच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. कधी दोघे कॅमेऱ्यासमोर एकत्र पोज देत आहेत, तर कधी आईस्क्रीम खाताना दिसत आहेत. त्याचवेळी अचानक प्रियांका आणि निक एकमेकांना किस करताना देखील दिसत आहे. यादरम्यान दोघेही खूप क्यूट दिसत असून त्यांना एकत्र पाहून चाहत्यांने कमेंट बाॅक्समध्ये प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

व्हिडिओमधील दोघांच्या लूकबद्दल बाेलायचे झाले, तर प्रियांकाने ब्रॅलेट आणि मिडी स्कर्टसह लेदर जॅकेट परिधान केले आहे. यासोबत प्रियांकाने हूप इअररिंग्स, ब्लॅक सन ग्लासेस आणि ब्लॅक स्नीकर्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे, ज्यामध्ये प्रियांका खूपच हॉट दिसत आहे. त्याचवेळी, निकने लाल रंगाचा शर्ट आणि बेज पॅन्ट घातला आहे, ज्यामध्ये तो खूपच देखाना दिसत आहे.(bollywood priyanka chopra and nick jonas kiss during rome trip video goes viral on social media )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“हात तर जोडलेच आहे आता काय…”,म्हणत अमिताभ बच्चन यांचे ‘या’ महत्वाच्या व्यक्तीला गाऱ्हाणे

सोनम कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केले साडीतील फाेटाे; म्हणाली, ‘हे घालणे सर्वात…’

हे देखील वाचा