Friday, July 5, 2024

सोनू सूदचा सल्लागार बनून लोकांना फसवत होता बिहारचा व्यक्ती; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सन 2020 मध्ये सोनू सूद अनेक गरीब व गरजूंसाठी मसीहा म्हणून उदयास आला. लोकांना मदत करण्याचे वचन देणारा सोनू, अजूनही त्यांची काळजी घेत आहे आणि आपल्या संस्थेद्वारे हजारो लोकांना मदत करत आहे. पण यादरम्यान सोनू सूदचा मॅनेजर बनून लोकांची फसवणूक करताना एका व्यक्तीला पकडले गेले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील 23 वर्षीय आशिष कुमार सिंग याला, शनिवारी (3 मार्च) सायबराबाद पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने मुंबईतून अटक केली आहे. या व्यक्तीने त्याच्या ट्विटरवर बायोमध्ये, स्वत: ला सोनू सूदचा सल्लागार सांगून लोकांची फसवणूक केली आहे.

वृत्तानुसार, अभिनेता सोनू सूदच्या नावाने मदतीची कबुली देऊन, आरोपीने तेलंगणा येथील एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपीने ट्विटरवर स्वत: ला सोनू सूदचा सल्लागार सांगितले आहे. या फसवणूकीनंतर, सोनू सूदने पुन्हा लोकांना फसवू नका, असे म्हटले आहे.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीने, 3 मार्च रोजी पोलिसांशी संपर्क साधला. या व्यक्तीला तेलंगणा राज्यातील गरजू लोकांना मदत करायची होती. त्याला कळले की, सोनू सूद लोकांची मदत करतो. अशा परिस्थितीत, त्याने सूदच्या चॅरिटी कंपनीचा नंबर शोधणे सुरू केले. यानंतर त्याला एक नंबर मिळाला, ज्यावर त्याने कॉल केला.

या फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, ज्याने कॉल उचलला त्याने स्वत: चे सोनू सूदच्या चॅरिटी कंपनीचा सल्लागार म्हणून वर्णन केले. त्याने तेलंगणाच्या व्यक्तीला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याने सांगितले की, सूद 50 हजार रुपये देणगी देईल, परंतु त्याऐवजी त्याला नोंदणी फी म्हणून 8 हजार 300 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, काही दिवसांनंतर आरोपीने त्या व्यक्तीला बोलावून सांगितले की, सूदने आता मदतीसाठी 3 लाख 60 हजार रुपयांची मदत देण्याचे निश्चित केले आहे. परंतु यासाठी त्याला 60 हजार रुपये नोंदणी फी भरावी लागेल.

इतक्या मोठ्या रकमेच्या मागणीमुळे फिर्यादीला संशय आला आणि त्याने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोनूने आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे, त्याच्या नावाने फसवणूक होऊ नये म्हणून आवाहन केले आहे. इतकेच नाही तर सोनूने आपल्या अपीलमध्ये असेही म्हटले होते की, जर एखाद्या फसवणूक करणाऱ्याला पैशांची गरज असेल, तर तो त्यांना नोकरी देऊ शकतो. परंतु मदतीच्या नावाखाली कुणी फसवू नये.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना विषाणूला गंभीरतेने न घेता जुहू बीचवर लोकांची गर्दी, अभिनेत्रीने ट्वीटमार्फत केली लॉकडाऊनची मागणी

-फक्त २५० रुपये होता ‘दयाबेन’चा पहिला पगार; रक्कम मिळताच ठेवली होती ‘या’ व्यक्तीच्या हातावर

-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

हे देखील वाचा