प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूड आणि साऊथमधील आपल्या कलाकरीने धमाकेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सतत आपल्या चित्रपटामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असणारे दिग्दर्शक सध्या त्यांचा आगामी येणारा ‘डेंजरस‘ चित्रपटच्या प्रमोशनसाठी त्यांनी डेंजरच तिकडम लावली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक चक्क खाली बसून अभिनेत्रीचा पाय हातात घेऊन किस करताना दिसून आले, त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केलाय. मात्र, रामू याच्यासाठी हे कय नवीन नाही. यापूर्वीही त्यांच्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे नाव जोडले गेले होते.
उर्मिला मातोंडकर
‘रंगीला‘ (Rangila) चित्रपटादरम्या राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) उर्मिलाच्या प्रेमात एवढे वेडे झाले होते की, त्यांना प्रत्येक चित्रपटामध्ये फक्त उर्मिलाच हवी होती. हद्दत तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene) हिला काढून उर्मिलाला घेतले होते. उर्मिलाने तब्बल 13 चित्रपट राम वर्मासोबत केले. त्याशिवय त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एका खोलीचे नवही उर्मिलाच ठेवले होते. जेव्हा हे प्रकरण त्यांच्या बायकोला समजले तेव्हा तिने थेट उर्मिलाच्या कानफटातच मारली होती. यानंतर दिग्दर्शकाने थेट पत्नीला घटस्फोट देण्याचा कडक निर्णय घेतला होता.
मधु शालिनी
राम गोपाल वर्मा यांचे मित्र जगन्नाथ यांनी मधु शालिनीसोबत ओळख करुन दिली होती. तिने रामू यांच्या चित्रपाटमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने यापूर्वी तेलुगू आणि तामिळ चित्रपाटंमध्ये काम केले होते. अनेक वेळा यांच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा सुरु झाल्या होत्या.
निशा कोठारी
अभिनेत्री निशा कोठारी हिने रामू यांच्या जेम्स, शिवा, डार्लिंग, यासह अनेक चित्रपटामध्ये काम केले होते. त्याचदरम्यान यांच्यादेखिल अफेअरच्या चर्चांना उधान आले होते. 4 वर्ष ते दोघे एकत्रच होते मात्र,आरजीव्हीचा म्युझिक चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर निशाला अनेक फ्लॉफ चित्रपटांचा सामना करावा लागला होता, यानंतर अभिनेत्रीने 2011 नंतर इंडस्ट्रीमधून दिसेनासी झाली.
जिया खान
दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने राम गोपाल वर्मा यांच्या निशब्द चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. माध्यमातील वृत्तानुसार यांच्यादेखिल अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्याशिवाय तिच्यासाठी रामू यांनी माहागडे घरही घेतले होते. मात्र, अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यासोबत जियाच्या काही अफवा पसरल्या त्यांमुळे त्यांचे वेगळे झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीनं व्यक्त केलं एकमेकांवरचं प्रेम; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या प्रकाशाचा किरण…’
‘देख रहा है ना बिनोद, ब्रॅंड मिळणे बंद झाले का?’, आमिर खान पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर