Saturday, April 20, 2024

‘देख रहा है ना बिनोद, ब्रॅंड मिळणे बंद झाले का?’, आमिर खान पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. काही दिवसांपूर्वी त्याची मुलगी आयरा खान हिच्या साखरपुड्यातील डान्समुळे अभिनेता चांगलाच चर्चेत आला होता. मात्र नुकतंच सोशल मीडिवर अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) याने नुकतंच त्याची पूर्व पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत ‘आमिर खान प्रोडक्शंस’ मध्ये कलश पुजा करताना दिसून आला. ‘लाल सिंग चड्ढा‘ चित्रपटाचे दिग्दर्शक याने अद्वैत चंदन (Advait Chandan) यांनी आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन पार पडलेल्या पुंजनाचे काही फोटो शेअर केले होते. ज्यामुळे पुन्हा एकदा आमिर खानला जोरदार ट्रोल केलं जात आहे. त्याशिवाय सोशल मीडिवर अभिनेत्याचे नवान ट्रेंड दाखवत आहे.

 

View this post on Instagram

 

शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र, यामुळे आमिरला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. “लाल सिंग चड्ढा बॉक्सऑफिसवर दणक्यात आदळल्यामुळे अभिनेता पुजा करत आहे असे काही नेटकऱ्यांचे मत आहे.” तर काहींच्या मते “अभिनेत्याला ब्रॅंड मिळणे बंद झाले आहे का?, ज्यामुळे तो पुजा करत आहे.” तर एकाने हद्दच पार करत लिहिले की, “देख रहा है विनोद कितनी पुरानी फोटो दिखाकर और थोड़ा अंग्रेज़ी बोलकर कैसे उल्लू बनाया जाता है.” अशाप्रकारच्या अनेक प्रश्नांना वर्षाव फोटोंवर केला जात आहे. त्यामुळे अभिनेतावर ट्रोलर्सचा वर्षावर होत आहे असेच म्हणावे लागणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मोठा माणूस लहाण मुलीला डेट करत असेल तर तो प्लेयर आणि जर…’, मलायकाचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
जान्हवीनं बोल्डनेसची हद्दच केली पार, पाहा व्हायरल फोटोशूट!

हे देखील वाचा