Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड प्रतिक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार दिसला दमदार भूमिकेत

प्रतिक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार दिसला दमदार भूमिकेत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) यांची आगामी राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ‘राम सेतू’च्या अस्तित्वाच्या वादावर आधारित आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भऱ्यात अडकतचं आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 25 ऑक्टोबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline fernandez) आणि नुसरत भरुचा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा ट्रेलर ऍक्शन, थ्रिलर परिपूर्ण आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत लिहिले की, ‘तुम्हाला राम सेतूची पहिली झलक आवडली होती. आशा आहे की तुम्हाला ट्रेलर देखील खूपचं आवडेल आणि या दिवाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासह राम सेतूच्या दुनियेचा एक भाग व्हा’. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे संवाद त्यांनी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासोबत मिळून लिहिले आहेत.

या चित्रपटाची कथा राम सेतू वाचवण्याच्या मिशनची आहे. चित्रपटात अक्षय एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे आणि तो राम सेतू खरा आहे की काल्पनिक आहे. याची चाचपणी करत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 2 मिनिट 9 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नक्कीच चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढेल.

‘राम सेतू’ चित्रपटाची कथा नास्तिक पुरातत्वशास्त्रज्ञ आर्यन कुलश्रेष्ठ भोवती फिरते, त्याला दुष्ट शक्तींनी भारताच्या वारशाचा स्तंभ नष्ट करण्यापूर्वी पौराणिक राम सेतूचे वास्तविक अस्तित्व सिद्ध करण्यास सांगितले जाते. यात अक्षय कुमार राम सेतू उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांशी लढताना दिसत आहे आणि जॅकलीन फर्नांडिस प्रभू रामाचे प्रतीक असलेल्या राम सेतूचे अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

राम सेतूच्या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्माते आणि चाहत्यांना अक्षयच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. मात्र प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किती धमाका करतो हे दिवाळीच्या मुहूर्तावर लवकरच कळेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! या भाेजपुरी अभिनेत्रीनं स्विमसूटमध्ये केलं फाेटाेशूट; चाहते म्हणाले, ‘दिल गार्डन-गार्डन…’
कांजीवरम साडी अन् केसांत गजरा शैहनाजचा व्हायरल लूक

हे देखील वाचा