कपूर कुटुंबाच्या चिंतेत वाढ; रणबीर कपूर कोरोनाच्या विळख्यात, आईने पोस्ट शेअर करत दिली माहिती

bollywood ranbir kapoor is unwell uncle randhir kapoor speaks on his heath


कपूर कुटुंबियांवर मागच्या महिन्यातच दुःखाचा डोंगर कोसळला होता. 9 फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूडला धक्का बसला होता. या दुःखातून कपूर कुटुंब सावरत होते, तेवढयातच त्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आजारी असल्याचे वृत्त आहे. आई नीतू कपूरनंतर तो देखील कोरोना व्हायरसचा बळी ठरला आहे. रणबीरला सध्या विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, त्याची प्रकृती स्थिर असून तो आराम करत आहे.

कोरोना व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी कोविड-19 ची लस आली आहे. परंतु अद्याप हा धोका पूर्णपणे टळलेला नाही. लोक लसीकरण करीत आहेत, परंतु कोरोनाची प्रकरणे सतत समोर येत आहेत. अशी बातमी आहे की, रणबीर कपूरही कोविड-19 बरोबर लढत आहे.

रणबीरच्या आजाराची बातमी समोर आल्यानंतर, त्याचे काका रणधीर कपूर यांनी या संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघड केले आहे. त्यांनी सांगितले की, होय हे खरे आहे की रणबीर कपूर आजारी आहे. या संदर्भात जेव्हा त्याचे काका रणधीर कपूर यांना विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की, “रणबीरची तब्येत ठीक नाही, पण त्याला कोविड झाला आहे की नाही हे माहित नाही.”

परंतु रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रणबीर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे सांगितले आहे.

या बातमीनंतर आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांच्या चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कारण अलीकडेच आलिया आणि अयान दोघेही रणबीरसोबत ब्रह्मास्त्रच्या सेटवर दिसले होते. तिथे त्यांनी काली देवीचा आशीर्वादही घेतला होता.

यापूर्वी रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूरदेखील ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कोरोनो व्हायरसच्या तावडीत सापडल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सहकलाकार अभिनेता वरुण धवन देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. वरुणशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा इत्यादी अनेक सेलेब्सनी ही लढाई लढली आहे.

रणबीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणबीर आणि आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत असून, चित्रपट तीन भागात बनवणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.