Thursday, March 28, 2024

वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात

बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेते आपला वाढदिवस ग्रँड पद्धतीने साजरा करताना आपण नेहमीच पाहिले आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत असतो. परंतू काही सेलिब्रेटी याला अपवादही आहेत. ज्यांना आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करायला आवडतो. यातीलच एक नाव म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर होय.

नुकतेच त्यांनी वयाच्या ६६व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपला वाढदिवस हे काही तरी मोठ्या थाटामाटात साजरा करतील अशी सर्वांनाच वाटत होते. मात्र त्यांनी आपल्या वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला आहे. ज्यात त्यांनी स्वतःला देखील पावरी ट्रेंडमध्ये सामील करून घेतले आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्री या पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत या ट्रेंडमध्ये सहभागी झाली होती, ज्यात आता अनुपम खेर यांनी नंबर लावला आहे.

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनुपम खेर यांनी हा दिवस अधिकच आठवणीत राहावा यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते सुद्धा पावरीचा आनंद घेताना दिसत आहेत. आपल्या वाढदिवसाची सुरवात त्यांनी लहान मुलांपासून केली, ज्यात ते म्हणत आहेत की , “आज मेरा बर्थडे है, ये मेरे दोस्त है और हमारी पावरी हो रही है” सोबतच ते या लहान मुलांसोबत नाच करताना दिसत आहेत. अनुपम खेर यांचा हा अंदाज चाहत्यांच्या अधिकच पसंतीस पडला आहे.

एकीकडे त्यांना आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे हा व्हिडिओ शेअर होताच. सोशलवर सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय त्यांनी आणखी एक प्रपोज केला होता त्याच्यामध्ये त्याने लिहिले आहे की, “हे फोटो आणि व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला कळेल की खरा आनंद कशात आहे, माझ्या कायम आठवणीत राहिला असा वाढदिवस साजरा झाला, या लहान मुलांनी माझ्या वाढदिवसात सहभागी होऊन अधिकच खास बनवला. त्यांना माझ्याकडून खूप प्रेम.”

आपल्या ३७ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये पाचशेहून अधिक चित्रपटात काम करणारे अनुपम खेर हे एक नावाजलेले अभिनेते आहेत. परंतु त्यांना खरी ओळख मिळवून दिली ते ‘सारांश’ या चित्रपटाने. त्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. त्यांच्या ‘राम लखन’ या चित्रपटासाठी त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांनी ‘हम आपके है कौन’,’विजय’, ‘दिलवाले ‘दुल्हनिया ले जायेंगे’, ‘तेजाब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.  प्रत्येक चित्रपटात ते वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांनी साकारलेली विरोधी भूमिका देखील तितक्याच लोकप्रिय आहे

हे देखील वाचा