Friday, July 5, 2024

बड्डे हाय भावाचा.! भाईजानच्या बॉडीगार्डचा बड्डे जोशात साजरा, मात्र सल्लूचा केक खाण्यास नकार? पाहा व्हिडिओ

सलमान खान आणि त्याचे बॉडीगार्ड यांची नेहमीच चर्चा होत असते. कधी सलमानच्या वादांची, तर कधी त्याच्या बॉडीगार्ड्सच्या वादांची चर्चा होत असते. आताही त्याची आणि त्याच्या बॉडीगार्ड्सची चर्चा होत आहे. मात्र, ही चर्चा जरा एका विशेष बाबींसाठी होत आहे.

यात सलमान आणि त्याचे बॉडीगर्ड्स देखील सहभागी आहेत. मात्र, हा कुठला वाद नाही. तर सलमानचा बॉडीगार्ड जग्गी याच्या बर्थडे पार्टीबाबत आहे. या बर्थडे पार्टीत काय काय धमाल झाली आहे, ते आपण आता पाहुयात.

सलमानचा बॉडीगार्ड शेरा हा आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. कारण सदानकदा तो त्याच्याच सोबत असतो. परंतु सलमानच्या इतर बॉडीगार्ड्स बद्दल आपल्याला तितकीशी माहिती नसते. परंतू, सलमान हा त्याच्या सर्व बॉडीगार्डसना त्याचं कुटुंबच मानतो आणि त्यांच्या प्रत्येकाच्या सुख आणि दुःखात सहभागी देखील होत असतो.

सलमानच्या इतर गार्डसपैकी जग्गी चा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सलमान हा स्वतः तिथे उपस्थित होता. या बर्थडे पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ज्यात आपल्याला दिसत आहे की जग्गी केक कापल्यानंतर जेव्हा सलमान ला भरवायला जातो त्यावेळी सलमान देखील केक खाण्यासाठी पुढे येतो. मात्र, केक न खाताच त्याला चकवतो. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. यावरून आपल्याला दिसून येतं की सलमान हा त्याच्या जवळच्या माणसांशी किती सहजतेने आणि प्रेमाने वागतो.

सलमानचा उदारपणा काही कोणापासून कधीच लपलेला नाही. त्याच्या बिंग ह्यूमन या संस्थेकडून तो नेहमीच समाजोपयोगी कार्ये करतच असतो. ज्या ज्या वेळी जिथे कुठे मदतीची गरज असते सलमान नेहमीच तिथे मदतीचा एक हात कायम पुढे ठेवतो.

सलमान हा सध्या त्याच्या येऊ घातलेल्या ‘अंतिम’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान आपल्याला पगडी घातलेल्या एक शीख पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाचे मोशन पोस्टर हे नुकतेच प्रदर्शित झाले असून या सिनेमाचं दिग्दर्शन खुद्द महेश मांजरेकर करत आहेत. त्यामुळे या सिनेमाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

हे देखील वाचा