Monday, June 17, 2024

काय सांगता? बॉलिवूडचे तीनही खान करणार एकाच चित्रपटात काम! ‘या’ चित्रपटातून घडणार इतिहास

बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कर्तृत्वातून दबदबा निर्माण केलेले प्रस्थ म्हणजे ‘तीन खान’. थ्री खान्स ऑफ बॉलिवूड या उक्तिने प्रसिद्ध असलेले हे तीन अभिनेते म्हणजे सलमान खान, अमीर खान आणि शाहरूख खान.

बॉलीवूडचे तीन ‘खान’ सुपरस्टार पहिल्यांदाच एकाच सिनेमात काम करणार आहेत. हे तिन्ही खान आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ सिनेमात एकत्र स्क्रीन शेयर करताना दिसणार आहे.

मागील २५ वर्षात प्रथमच हा चत्मकार घडणार आहे. अनेक दिग्दर्शक निर्मात्यांनी या तिन्ही खान मंडळींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कोणालाच जमले नाही. परंतू, अद्वैत चंदन या दिग्दर्शकाने हे अशक्य काम शक्य करून दाखवले आहे.

प्राप्त माहितीनुसार या सिनेमात सलमान आणि शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान या सिनेमात ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. शाहरुख त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेमातील राज ही भूमिका साकारणार आहे.

lal singh chaddha
lal singh chaddha

सध्या हाती असलेल्या माहितीनुसार शाहरुखने आधीच सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे. तर सलमान लवकरच त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रातून एक दिवसाचा वेळ काढत मुंबईत आमिर सोबत शूटिंग करणार आहे.

यापूर्वी आमिर आणि सलमान यांनी ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात सोबत काम केले होते. सलमान आणि शाहरुख यांनी करण-अर्जुन, कुछ कुछ होता है, हर दिल जो प्यार करेगा, हम तुम्हारे हैं सनम, ट्यूबलाइट आणि झिरो या सिनेमात एकत्र काम केले आहे.

मात्र, शाहरुख आणि आमिर पहिल्यांदाच या सिनेमात एकत्र दिसणार आहे. या सिनेमाचे जवळपास संपूर्ण शूटिंग झाले असून आमिरसोबत करीना कपूर-खान दिसणार आहे.

आमिर आणि करीनाचा थ्री इडियट्स आणि तलाश नंतरचा हा तिसरा एकत्र चित्रपट असणार आहे. हा सिनेमा ह्याच वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे या चित्रपटांची शूटिंग राखडल्यामुळे आता हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

हे देखील वाचा