Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

खास मुलांसोबत ‘भाईजान’ने लावले ठुमके; ‘डाउन सिंड्रोम डे’ निमित्त शेअर केलेल्या व्हिडिओचं होतंय भरभरून कौतुक

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच नाही, तर त्याच्या चांगल्या कार्यांसाठीही चर्चेत असतो. खासकरुन सलमान खानचे लहान मुलांवर असलेले प्रेम कुणापासून लपलेले नाही. सलमान बर्‍याचदा लहान मुलांबरोबर मस्ती करताना दिसत असतो. आता त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सलमान खान काही खास मुलांसोबत दिसला आहे.

हा व्हिडिओ स्वत: ‘भाईजान’ने शेअर केला आहे. हा व्हिडिओ थोडा जुना आहे. मात्र, ‘वर्ल्ड डाउन सिंड्रोम डे’ निमित्त त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये सलमान खान काही मुलांसोबत नाचताना दिसत आहे. हे पाहून अभिनेत्याचे चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. स्पेशल मुलांसोबतचा सलमान खानचा हा व्हिडिओ चांगलाच पसंत केला जात आहे.

व्हिडिओ शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘उमंगच्या मुलांसोबत डान्स. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.” व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, कशाप्रकारे सलमान या मुलांना डान्स शिकवत आहे आणि त्यांच्याबरोबर मजाही करत आहे.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ इतका आवडला आहे की, व्हिडिओला आतापर्यंत 22 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडिओमध्ये सलमानसोबत अभिनेत्री बीना काक आणि बॉडीगार्ड शेरादेखील दिसत आहेत. त्यांनीही या क्षणाचा आनंद घेतला. सलमान यावेळी फुल फन मूडमध्ये दिसत होता आणि मुलंही त्याच्याबरोबर आनंदी दिसत होती.

सलमान खान लवकरच आपल्या आगामी ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या ईदला म्हणजेच १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा