Friday, July 5, 2024

विमानतळावरून बाहेर येताच सारासोबत चाहत्याने केले ‘असे’ कृत्य; तिनेही चांगलंच सुनावलं, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर वागलीस सारा’

‘केदारनाथ’ चित्रपटातून साराने आपल्या अभिनयाला सुरुवात केली आहे. आपल्या उत्तम अभिनयाने तिने कायमच  चाहत्यांची मने जिंकली आहेत. आपल्या खोडकर स्वभावाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आजकाल ती कुटुंबासमवेत बराच वेळ घालवत आहे. अलीकडे नेहमीच हसणारी आणि आनंदी असणारी सारा चिडताना दिसली आहे. सारा विमानतळाबाहेर येताना, एक चाहता तिच्याकडे येऊ लागतो, आणि तो त्याचा मास्क काढून सेल्फी घेऊ लागतो. एवढ्यात साराला खूप राग येतो आणि ती रागाच्या भरात त्या व्यक्तीला दोन-चार गोष्टी सुनावते.

सारा अली अली खान अलीकडेच विमानतळावरून बाहेर येत होती. यादरम्यान, तिने फेस शील्ड आणि मास्क घातला होता. ती विमानतळाबाहेर पोचताच, एक चाहता तिच्या जवळ येऊन मास्क काढून सेल्फी घेत होता. या चाहत्याच्या  कृत्याने, सारा फारच भडकली, आणि ती त्याला म्हणाली, ‘तू काय करत आहेस?’ यानंतर, सारा हात जोडत उभे असलेल्या सर्वांना समजावत म्हणाली, असे अजिबात केले नाही पाहिजे. यानंतर सारा उपस्थित सगळ्यांचे आभार मानत तिच्या गाडीत जाऊन बसते.

https://www.instagram.com/p/CONxtVTBfEU/?utm_source=ig_web_copy_link

साराचा हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, साराचे अनेक चाहते तिच्या नाराजीला पाठिंबा दाखवत आहेत. चाहते म्हणतात की, कोरोना युगात, लोकांना समजले पाहिजे की, एक छोटी चूक एखाद्यासाठी मोठी समस्या बनू शकते.

सारा बर्‍याच दिवसांपासून प्रवास करत आहे. काही काळापूर्वी ती काश्मीरच्या सुट्टीवर गेली होती, जिथे ती आपली आई अमृता सिंग आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत मस्ती करताना दिसली होती. त्यानंतर ती देखील मालदीवला रवाना झाली होती. मालदीवला गेल्यावर सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोघीही व्यायाम करत होत्या. आता ती मुंबईत परतली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुलगी असावी तर अशी! ‘ताल से ताल मिला’ गाण्यावर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने लावले आईसोबत ठुमके, पाहा व्हिडिओ

-काय सांगता! अभिनेत्री अनुष्का शर्माने दिले होते आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी ऑडिशन; जुना व्हिडिओ व्हायरल

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

हे देखील वाचा