सारा अली खान लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे यात ती तिच्या ‘गर्ल-नेक्स्ट-डोर’ वाल्या इमेजपेक्षा वेगळं काहीतरी करताना दिसणार आहे. अभिनेत्रीने नुकताच तिच्या या आगामी प्रोजेक्ट ‘मिशन फ्रंटलाइन’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. साराने इंस्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती ऍक्शन मोडमध्ये दिसत आहे. तसेच हा शो येत्या १३ ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी प्लसवर प्रदर्शित होणार आहे.

या शोमध्ये सारा अली खान आसामच्या वीरांगना फोर्ससोबत अनेक फिजिकल ट्रेनिंग रूटीन्स करताना दिसणार आहे. वीरांगना फोर्स हे भारतातील पहिले महिला कमांडो युनिट आहे, जे महिलांवरील वाढते गुन्हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक प्रशिक्षित महिला पथक आहे, ज्यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. (bollywood sara ali khan mission frontline veerangana look instagram post)
कोण आहेत वीरांगणा फोर्स
साल २०१२ मध्ये लॉन्च झालेल्या वीरांगना फोर्सला तामिळनाडूमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. या पथकात समाविष्ट सर्व महिला आसामच्या पोलिस अधिकारी आहेत. या दलाला सायलेंट ड्रिलचे प्रशिक्षण मिळाले आहे, जे फक्त यूएस मरीनसाठी उपलब्ध आहे. वीरांगना फोर्स मार्शल आर्ट्स, बाइक राइडिंग, घोडेस्वारी, शस्त्रे हाताळणे आणि महिलांना त्रास देणाऱ्यांना वठणीवर आणण्यात पारंगत आहे. तसेच त्यांचा गणवेश काळा असतो आणि डोक्यावर वायलेट टोपी आहे.
सोबतच सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…










