Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खरा टॅलेंट इथे आहे!’ सारा अली खानने गायले ‘दमादम मस्त कलंदर’, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा सूफी अंदाज

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी मुलगी सारा अली खान ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सारा तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी नेहमीच नवीन आणि मनोरंजक पोस्ट शेअर करते, ज्यांना तिच्या चाहत्यांकडून खूप प्रेमही मिळते. डान्स आणि मजेदार व्हिडिओंनंतर आता साराची सूफी स्टाईल समोर आली असून, यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये ती मजेदार अंदाजात ‘दमा दम मस्त कलंदर’ गाताना दिसत आहे.

व्हिडिओमधील साराचे एक्सप्रेशन्स इतके अप्रतिम आहेत की, प्रत्येकजण तिच्या या कौशल्यांचे कौतुक करत आहे. व्हिडिओमध्ये तिने राखाडी रंगाचा हायनेट टॉप आणि काळी जीन्स परिधान केली आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, “खरा टॅलेंट इथे आहे.” चाहते साराच्या या स्टाईलचा खूप आनंद घेत आहेत.

हा व्हिडिओ साराच्या लेटेस्ट ट्रिपचा आहे. सारा तिचा भाऊ इब्राहिम अली खान आणि काही मित्रांसह सुट्टीवर गेली आहे. तिने गुलमर्गमधील तिचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. यात ती दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत सोबत दिसली होती. त्यानंतर ती उल्लेखनीय कामगिरी करत, बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. सोशल मीडियावर चित्रपटासंबंधित बरेच फोटो समोर आले आहेत. ज्यातून हे दिसून येते की, चित्रपटाविषयी सारा खूपच उत्सुक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिल्मफेअर अवॉर्डकडे पाहून मराठमोळ्या रितेश देशमुखने दिले भन्नाट एक्सप्रेेशन्स, पाहून तुम्हीही हसून हसून व्हाल लोटपोट

-भारतीय गायिकेचा अमेरिकेत डंका! नेहा कक्करच्या स्टेज परफॉर्मन्सने ह्युस्टनमधील प्रेक्षकांना पाडले होते नाचण्यास भाग, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ

-‘बिग बॉस’चा माजी कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लाने साधला पाकिस्तानी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निशाणा, म्हणाला ‘वा रे वा…’

हे देखील वाचा