नेहा कक्कर त्या सेलिब्रेटींपैकी एक आहे, जी नेहमीच चर्चेत राहते. नेहा जितकी तिच्या गायनासाठी ओळखली जाते, तितकीच ती डान्स आणि कॉमेडीमध्येही माहीर आहे. नेहा तिच्या गाण्यांनी नेहमीच धमाल करत असते. पण याव्यतिरिक्त, ती जेव्हा स्टेजवर परफॉर्म करते तेव्हाही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमते. नेहा कक्कर देश-विदेशातील स्टेज परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांना वेड लावत असते. असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जेव्हा तिने अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये परफॉर्म करत धमाल केली होती.
नेहा कक्करचा हा थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने तिचे एक हिट गाणे गाऊन, प्रेक्षकांना नाचण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ सज्जद कुरेशी नावाच्या यूट्यूब चॅनलवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला 80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेहाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेहा कक्करची सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. बॉलिवूडमधील ती अशी एकमेव गायिका आहे, जिच्या फॉलोअर्सची संख्या कोटींमध्ये आहे. तिला इंस्टाग्रामवर सुमारे 53.8 दशलक्ष लोक फॉलो करतात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नेहा कक्कर सध्या इंडियन आयडल सिझन 12 मध्ये जज म्हणून दिसत आहे.
नेहा बॉलिवूडची एक प्रसिद्ध गायिका आहे. तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. अलीकडेच नेहाचे ‘मरजानिया’ हे गाणे रिलीझ करण्यात आले होते, ज्याला तिच्या चाहत्यांकडून खूप पसंत केले गेले. या गाण्यात रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लाचा रोमान्स पाहायला मिळाला. नेहाच्या हिट गाण्यांच्या यादीमध्ये ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रांस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’, ‘जादू की झप्पी’ आणि ‘दिलबर’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल