Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सरगुन मेहताच्या ‘किस्मत २’ने बॉक्स ऑफिसवर केली धमाल, दोनच दिवसात केला ‘इतक्या’ कोटीचा गल्ला

मनोरंजन विश्वात जशी मराठी, हिंदी आणि तेलुगू गाणी प्रसिद्ध आहेत. तसेच पंजाबी गाणी आणि चित्रपटांची लोकप्रियता देखील खूप वाढली आहे. त्याचा थेट परिणाम नुकताच प्रदर्शित झालेला ‘किस्मत २’ या चित्रपटावर झाला आहे. साथीच्या आजारांने संपूर्ण जगावर थैमान घातले. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. तसेच चित्रपटगृहही बंद ठेवण्यात आली. परंतू, साथीच्या आजाराचे निर्बंध न जुमानता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटातील अभिनेत्री सरगुन मेहता आणि एमी विर्क यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हा चित्रपट गुरुवारी (२३ सप्टेंबर ) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने फक्त दोन दिवसात प्रचंड कमाई केली आहे. त्यामुळे प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने खूप चांगली कामगिरी करून कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटाचा बाॅक्स ऑफिसचा रिपोर्ट इतर कोणी शेअर न करता अभिनेत्री सरगुनने शेअर केला आहे. सरगुनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सरगुनने इंस्टाग्रामवर बाॅक्स ऑफिस कलेक्शन शेअर केले. त्यात लिहिले आहे की, “चित्रपट ‘किस्मत २’ने पहिल्याच दिवशी २.०७ करोड रूपये कमावले आहे. तर दुसर्‍यादिवशी २.५०हून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात दोन दिवसांत ४.५७ करोडहुन अधिक कमाई केली आहे.” त्या पोस्टाल ६० हजारांहून अधिक लाईक मिळाले आहेत. सरगुनने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बानी आणि शिवला नक्कीच भेट द्या.”

https://www.instagram.com/p/CUPUY0GtbG6/?utm_source=ig_web_copy_link

सरगुनच्या या पोस्टवर चाहतेच नाही, तर अनेक कलाकारही कमेंट करत आहेत. प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट करताने लिहिले की, “यु आर द बेस्ट.” हा चित्रपट विकेंडवर खूप चांगली कमाई करू शकतो. ‘किस्मत’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक खूप दिवस ‘किस्मत २’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या सिक्वेलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

पहिल्या सिक्वेलसारखाच दुसऱ्या सिक्वेललाही प्रेक्षकांशी भरभरून प्रतिसाद दिला. जगदीप सिद्दू दिग्दर्शित या चित्रपटात सरगुन मेहता, एमी विर्क आणि अलावा तानियाने मुख्य पात्र साकारले आहेत. या चित्रपटाची स्टोरी मैत्री आणि प्रेमावर आधारित आहे. सरगुनविषयी बोलायचे झाले, तर सरगुन एक भारतीय अभिनेत्री असून ती माॅडेल देखील आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा