Friday, July 5, 2024

सरोज खानच्या नावावर सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम, पाहा कोणती आहेत ती 8 गाणी

बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्स नंबर्सच्या कोरिओग्राफरबद्दल बोललं तर सरोज खानचं नाव नक्कीच येईल. सरोज खान यांनी अनेक डान्स नंबर हिट करण्यासाठी त्यांच्या स्टेप्स दिल्या आहेत, जे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. सरोज खान यांना 8 वेळा सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. आज सरोज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या सर्वोत्कृष्ट 8 डान्स नंबरबद्दल जाणून घेऊया…

कोरिओग्राफर सरोज खान (saroj khan) यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला. सरोज यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1950 पर्यंत त्या बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होत्या. 1974 मध्ये त्यांनी कोरिओग्राफर म्हणून आपला प्रवास सुरू केला. सरोज यांनी अनेक गाणी त्यांच्या स्टेप्सने अशा प्रकारे सजवली की, ती आजही प्रेक्षकांना आवडतात. सराेज यांना मिळालेल्या फिल्मफेअर अवॉर्डबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी हा पुरस्कार 8 वेळा जिंकला आहे.

सण 1989 मध्ये त्यांना ‘तेजाब’ चित्रपटातील ‘एक दो तीन..’ या गाण्यासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. या गाण्याच्या स्टेप्स इतक्या वेगळ्या होत्या की प्रत्येकजण त्या करू लागला. विशेषतः या गाण्याने माधुरी दीक्षितला खूप प्रसिद्धी मिळाली.

सराेज यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार ‘चालबाज’ चित्रपटातील ‘ना जाने कहां से आयी है…’ या गाण्यासाठी मिळाला होता. हे गाणं श्रीदेवीवर चित्रित करण्यात आले हाेते.

यानंतर सरोज यांना 1991मध्ये ‘सैलाब’ चित्रपटातील ‘हमको आज कल है इंतजार…’ या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

सरोज खानबद्दल बाेलत आहाेत आणि ‘धक धक करने लगा…’ गाण्याचा उल्लेख हाेणार नाही असं हाेऊ शकत नाही. ‘बेटा’ चित्रपटातील या गाण्यासाठी सरोजला 1993 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. गाण्याची नाडी पकडत सरोज यांनी हे गाणं अतिशय आकर्षक पद्धतीने कोरिओग्राफ केले.

सण 1994 मध्ये ‘खलनायक’मधील ‘चोली के पेचे क्यो है…’ या गाण्यासाठी त्यांना 5 वा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. हे गाणे त्या काळात खूप गाजले आणि माधुरीची स्टाईल सर्वांनाच आवडली.

सरोज खान यांना 2000 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘निंबूडा निंबूडा’ या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऐश्वर्या रायवर चित्रित झालेल्या या गाण्याच्या हुक स्टेप्स लोकांना आजही आवडतात.

तुम्हाला ‘देवदास’ चित्रपट आठवत असेलच. या चित्रपटातील सर्व गाणी खास असली तरी माधुरी आणि ऐश्वर्यावर चित्रित केलेले ‘डोला रे डोला…’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले. या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी सरोज खान यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता.

सण 2008 मध्ये ऐश्वर्या रायवर चित्रित केलेल्या ‘बरसो रे मेघा मेघा…’ या गाण्याची कोरिओग्राफी खूपच छान होती. चित्रपटातील या गाण्यासाठी सरोज खान यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. (bollywood saroj khan birth anniversary see her best choreography which got film fare award)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यन नाही, ‘हा’ व्यक्ती आहे त्याच्या घराचा शहजादा, जाणून घ्या त्याचे वैयक्तिक आयुष्य
कॉमेडी आणि रोमान्स करून कार्तिक आर्यन झालाय बोर, ‘हा’ रोल निभावण्याची इच्छा केली व्यक्त

हे देखील वाचा