‘अन्न तू नाही अल्लाह देतो’, जेव्हा सर्वांसमोर सलमान खानवर चिडल्या होत्या कोरिओग्राफर सरोज खान

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ते माधुरी दीक्षितपर्यंत (Madhuri Dixit) बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सुंदर अभिनेत्रींना डान्स शिकवणाऱ्या कोरिओग्राफर सरोज खान (Saroj Khan) आज आपल्यात नसतील. पण त्यांच्या अनेक कथा आणि किस्से स्टार्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. सरोज खान केवळ त्यांच्या डान्ससाठीच नाही, तर त्यांच्या खडतर स्टाईलसाठी देखील ओळखली जात होत्या. सेटवर त्या अनेकदा डान्स शिकवण्यासोबतच रागवायच्या देखील.

त्यांची अशीच एक जुनी गोष्ट आजही आठवते. सेटवर अनेक कलाकारांना त्यांनी फटकारले. त्यापैकी एक सलमान खान (Salman Khan) आहे. दोघांचा खूप जुना किस्सा आहे. जेव्हा सरोज खान यांनी सेटवर उपस्थित सर्व स्टार्स आणि क्रूसमोर सलमान खानला फटकारले. हा किस्सा ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या सेटवरील आहे. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत दिसले होते.

या चित्रपटात ‘ये चांद और ये दूरी’ हे गाणे होते. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. गाण्याच्या कोरिओग्राफी दरम्यान सलमान खान सरोज खान यांच्यावर चिडला. आपल्यापेक्षा आमिरला सरोज खान चांगली स्टेप्स देत असल्याचे सलमानला वाटत होते. गाण्याच्या रिहर्सलदरम्यान सलमान खान सरोज खानवर इतका चिडला की, तो सुपरस्टार झाल्यावर तिच्यासोबत काम करणार नाही, असे त्याने सर्वांना सांगितले.

सलमान खानचे हे बोलणे ऐकून सरोज खान यांनी सलमान खानला असे उत्तर दिले की, त्याची बोलतीच थांबली. त्यांनी सलमानला फटकारले आणि म्हटले की, “अन्न तू नाही अल्लाह देतो. माझ्यात टॅलेंट आहे, तू नाही तर दुसरं कोणतरी माझ्यासोबत काम करेल.” या कथेनंतर सरोज खान आणि सलमान खान यांच्यातील अनेक वर्षांचे संभाषण थांबल्याचे सांगितले जाते. यानंतर २०१६ मध्ये दोघांमधील अंतर आणखी वाढले.

खरं तर, एका मुलीने सरोज खान यांच्याकडे तिची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाली की, तिला सलमान खानशी बोलायचे आहे. जेव्हा सरोज खान यांनी सलमानला फोन केला तेव्हा सलमानने बोलण्यास नकार दिला. ज्यामुळे सरोज खान सलमान खानवर खूप चिडल्या होत्या. सरोज खान यांनी २००० हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. त्यानंतर २०२० मध्ये त्यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post