Monday, July 8, 2024

‘इंडियन साइन लैंग्वेज डिक्शनरी’मध्ये किंग खानचे नाव सामील, पीएम मोदींनी केली घोषणा

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, पण तो कधीच सोशल मीडियापासून दूर राहिला नाही. बर्‍याच काळापासून त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, पण शाहरुख कधी जाहिरातींसाठी, तर कधी त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो. शाहरुखने आतापर्यंत आपल्या कर्तृत्वाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा शाहरुख खान चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, ‘इंडियन साइन लैंग्वेज डिक्शनरी’सोबत शाहरुखचे नाव जोडले गेले आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडियन साइन लैंग्वेज डिक्शनरी’सुरू केली. ज्यात आता किंग खाननेही प्रवेश केला आहे.

पंतप्रधान मोदींनी या महिन्यात लैंग्वेज डेच्या निमित्ताने ‘इंडियन साइन लैंग्वेज डिक्शनरी’ सुरू केली होती. ज्यात आता किंग खानचे नावही सामील झाले आहे. ‘इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी’ किंग खानच्या नावाची नोंद ऐकून, त्याचे चाहते खूप खूश झाले आहेत. ही डिक्शनरी पीएम मोदींनी अपंगांना मदत करण्यासाठी लाँच केली होती. ज्यात आता शाहरुखचे नावही जोडले गेले आहे. ‘इंडियन साइन लैंग्वेज डिक्शनरी’मध्ये १०हजार शब्द आहेत, ज्यात शाहरुखचाही नावाचा समावेश आहे.

‘इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी’ आणि प्रशिक्षण केंद्राने त्याचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. तो व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडेच, शाहरुख पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसला. माध्यमातील वृत्तानुसार, शाहरुख एटलीच्या आगामी ‘लायन’ चित्रपटावर काम करत आहे. मात्र, त्या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर शाहरुख शेवटचा ‘झीरो’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारताना दिसल्या. यानंतर तो बराच काळ ब्रेकवर होता, पण या दिवसांत तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘पठाण’ या आगामी चित्रपटाची घोषणा कधी होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा