Saturday, June 29, 2024

काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. कोणत्याही ओळखीशिवाय त्याने यशाचे शिखर गाठले आहे. शाहरुख खान सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो अनेक वेळा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो मागे हटत नाही. याच दरम्यान शाहरुखचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. जो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये किंग खान अजय देवगण, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्याविषयी बोलताना दिसू शकतो. हा व्हिडिओ प्रत्यक्षात डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये, शाहरुख अभिनेता राजेश जैससोबत त्याच्या बाल्कनीमध्ये उभा आहे आणि त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना हात हलवून हॅलो करताना आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसत आहे.

शाहरुख व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्याच्या दिशेने इशारा करत आहे. व्हिडिओ शेअर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी कधीच असा विचार केला नव्हता की, असा ही दिवस पाहायला मिळेल. जेव्हा बॉलिवूडचा किंग खान आपली भीती व्यक्त करेल. आता मी सर्वकाही पाहिले आहे.” तर व्हिडिओमध्ये शाहरुख राजेशला पुढे म्हणत आहे की, “इतके जास्त चाहते कधी कुणाच्या घराबाहेर येतात का?” राजेशने उत्तर दिले की, “नाही सर. अजून तर पाहिले नाही, पण पुढे काय होईल सांगू शकत नाही.” शाहरुख चाहत्यांना हात हलवत राजेशला विचारतो की, “म्हणजे काय?” राजेश पुढे म्हणतो की, “बाकी सर्व स्टार्सचे शो आणि चित्रपट डिस्जी प्लस हॉटस्टारवर येत आहेत.” शाहरुख त्यांना विचारतो, “अच्छा? बाकी सगळे कोण?”

राजेशने अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि संजय दत्तसह काही कलाकारांची नावे घेतली. शाहरुखने पुन्हा विचारले की, “सगळे आहेत का?” राजेश म्हणाला की, “सर्वजण तर नाही.” हे ऐकून शाहरुखला थोडा धीर आला. तो पुढे विचारतो की, “कोण नाही?” तर राजेश पुढे म्हणतो की, “सर, तुम्ही.” यानंतर, शाहरुख चाहत्यांकडे त्यांच्या विनंतीवरून आणखी हात हलवू लागतो. व्हिडिओमध्ये शाहरुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर नसल्यामुळे घाबरलेला दिसत आहे. त्याला भीती वाटते की, यामुळे बाकीचे कलाकार त्याला मागे टाकतील.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा