Wednesday, February 21, 2024

जुही चावला झोपून गेल्यानंतर, तिच्या घरी पार्टीसाठी पोहचला शाहरुख खान; मग पुढे जे झाले…

बॉलिवूडचा बादशाह म्हणजे अभिनेता शाहरुख खानला हे यश मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शाहरुखने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये अढळ स्थान मिळवले आहे. संपूर्ण जगात शाहरुख खानची क्रेझ आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. इतकेच नव्हे, तर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याच्या चित्रपटांना आजही तेवढेच प्रेम मिळते. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मिळते. तसेच शाहरुखचे प्रचंड फाॅलव्हर्स आहेत. त्याला काही कलाकार अगदी आग्रहाने पार्टीसाठी आमंत्रण देतात. अशाच एका पार्टीतील किस्सा समोर आला आहे. शाहरुखनची सहकलाकार आणि जवळची मैत्रीण जुही चावलाने एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे.

जुही म्हणाली की, “आम्ही दरवेळी शाहरुखला पार्टीसाठी आमंत्रण देतो. पण शाहरुख सतत पार्टीला उशिरा पोहचतो. एके दिवशी शाहरुख पार्टिला इतका उशीरा आला की, तेव्हा सर्व जेवण संपले होते आणि मी पण झोपून गेले होते. शाहरुख घरी आला, तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते.” ती पुढे बोलताना म्हणाली की, “शाहरुख पार्टीला आला की खूप दंगा मस्ती सूरु असते. विशेषतः माझ्या सर्व स्टाफला त्याच्यासोबत फोटो काढायला खूप आवडते. तसेच शाहरुख आमच्या सर्वांसोबत गेममध्येही सहभागी होतो. म्हणूनच आम्ही त्याला नेहमीच पार्टीसाठी फोन करतो.”

यावेळी शाहरुखसोबत ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली दिग्दर्शक फराह खान म्हणाली की, “आपल्या सर्वांना माहित आहे की, जेव्हा शाहरुखला 9 वाजता उपस्थित राहण्याची वेळ सांगितली जाते, तेव्हा तो 2 वाजता उपस्थित येतो. जर तो 11 वाजता उपस्थित राहिला तर सर्व गडबड होते.” शाहरुख खान आणि जुही चावला हे अनेक दशकांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

शाहरुख खानच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर त्याचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
का ‘या’ व्यक्तीची दुसरी पत्नी बनली जुही चावला? अनेक वर्षांनी केला लग्न लपवण्यामागचा खुलासा

…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा