Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तो’ व्हिडिओ शेअर करत शनाया कपूरने दिल्या सुहाना खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा! चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी मुलगी सुहाना खान शनिवारी (२२ मार्च) आपला २१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत, तिच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सुहाना खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहतेही तिचे फोटो पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, तर तिच्या जिवलग मैत्रिणी शनाया कपूर आणि अनन्या पांडे तिला शुभेच्छा देणे कशा विसरतील?

अनन्या पांडेने सुहाना खानच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिने सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये सुहानासोबत अनन्या आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही दिसली आहे. तिघींचा हा फोटो बराच गोंडस असून, त्यात त्यांची मैत्रीही पाहायला मिळत आहे. हे त्रिकूट लहानपणापासूनच एकत्र आहे आणि आजही त्यांची मैत्री कायम आहे.

त्याच वेळी, शनाया कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडेसुद्धा दिसत आहे.

हा तिघींचा बालपणीचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना, शनाया आणि अनन्या पावसात एकत्र नाचताना दिसत आहेत. या तिघीही स्विमसूट परिधान करून खूपच गोड दिसत आहेत.

सुहाना, शनाया आणि अनन्याचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये सुहाना खानचे वडील आणि बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खानच्या ‘डॉन’ या चित्रपटातील ‘ये मेरा दिल’ हे गाणे वाजत आहे. ज्यावर तिन्ही स्टारकिड्स जोरदार नाचत आहेत. बरेच युजर्स या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “जंगल-जंगल बात चली है, पता चला है.” दुसर्‍याने लिहिले, “हे खूपच क्यूट आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

-सनी लिओनीने चाहत्यांना दिले ‘हे’ खतरनाक चॅलेंज, भल्या- भल्यांना फुटेल घाम घाम

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

हे देखील वाचा