Monday, July 1, 2024

पायत चप्पल अन् हातात पिशवी घेऊन स्कूटरवर निघाला अरिजित सिंग, गायकाचा व्हिडिओ व्हायरल

अरिजित सिंगच्या आवाजाचे सर्वांनाच वेड लागले आहे. गायक त्याच्या आवाजासोबतच चांगल्या स्वभावासाठीही ओळखला जातो. दरम्यान, गायकाचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये अरिजित सिंग बंगालमधील त्याच्या मूळ गावी मुर्शिदाबादमध्ये एका सामान्य व्यक्तीप्रमाणे रस्त्यावर फिरत आहे.

अरिजित (arijit singh) याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गावी अगदी साध्या पद्धतीने फिरताना दिसत आहे. खरे तर, पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गायकाल ओळखणे थाेडे कठीण आहे, परंतु दुसऱ्यांदा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर हा गायक अरिजित असल्याचे कळते. यादरम्यान सिंगर तिथे उभ्या असलेल्या लोकांशी बोलताना देखील दिसत आहे.

अशात अरिजितच्या या व्हिडिओवर चाहते जाेरदार कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की,’साधे राहण्याची पातळी पहा’, तर दुसऱ्या युजरने कमेंट लिहिले की, ‘अरिजित सिंगच्या या व्हिडिओने माझा दिवस बनवला.’ अशात एका व्यक्तीने गायकाची प्रशंसा करत कमेंटमध्ये लिहिले की, ‘अरिजित टॅलेंटेड व्यक्तीसोबतच एक अद्भुत व्यक्ती आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Arijit Singh (@arijitsingh)

अरिजीत सिंगने अनेक दमदार गाणे बाॅलिवूडला दिली आहे, ज्यामध्ये ‘तुम ही हो’, ‘चाहूं मैं या ना’, ‘फिर और क्या चाहिए’, ‘तेरा यार हु मैं’, ‘अगर तुम साथ हाे’ यासारख्या गाण्यांचा समाावेश आहे. (bollywood singer arijit singh in his hometown grocery shopping on scooter video viral )

हे देखील वाचा