Monday, July 1, 2024

याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. त्याने आपल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. त्याला सर्वोत्तम पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअरसारख्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या एका गाण्यामुळे चित्रपटातील नव्हे, तर खऱ्या खुऱ्या आयुष्यातील एक चोर पोलिसांच्या तावडीत सापडला होता.

ही गोष्ट आहे सन २००६ मधील, जेव्हा एक व्यक्ती मुंबईतील एका बारमध्ये गेला होता. तिथे त्याला ऑर्केस्ट्रामधील एक गायिका खूप सुंदर वाटली आणि दोन रात्रीतच त्याने एक लाख रुपये खर्च केले.

काही दिवसांनंतर तो व्यक्ती त्याच बारमध्ये गेला. तिथे त्याने हिमेश रेशमियाचे ‘हमको दीवाना कर गए’ वर नाचणाऱ्या डान्सरला आपल्याकडे बोलावले आणि नशेत पुन्हा पुन्हा तेच गाणे म्हणायला सांगितले. तिथे उपस्थित इतर ग्राहकांना जेव्हा ही गोष्ट पटली नाही, तेव्हा त्या व्यक्तीने खिशातून हजार रुपयांच्या नोटांची गड्डी काढली आणि हेच गाणे वाजणार म्हणून हट्ट करू लागला. त्यावेळी त्या ग्राहकांमध्ये पोलिसांचा खबरीही बसला होता. त्याने हे पाहून लगेच क्राईम ब्रांचला फोन केला.

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्या व्यक्तीला पकडले, तेव्हा समजले की त्याचे नाव दिवेश बोर्स असे होते. तो एक कामगार होता, जो मुंबईच्या एका प्रसिद्ध ज्वेलरकडे काम करत होता. त्या ज्वेलर्सचे कुटुंब त्यादिवशी परदेशात फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत दिवेशने चोरी केली होती. याची माहिती ज्वेलर आणि त्याच्या कुटुंबालाही माहिती नव्हती. इतकेच नाही, तर दिवेशकडे तब्बल ३० लाख रुपयांचे हिरे सापडले होते. हिमेश रेशमियाच्या एका गाण्यामुळे हा चोर सापडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दानशूर अजय देवगण धावून आला मराठी माणसांसाठी, शिवाजी पार्कमधील कोव्हिड आयसीयूला केली अशी मदत

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

-नुसता राडा…राडा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टा बोम्मा’ गाण्याने मोडले इतर गाण्यांचे रेकॉर्ड; मिळाले तब्बल ५९ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा