Wednesday, July 3, 2024

रॅपर हनी सिंग आणि त्याच्या टीमविरुद्ध तक्रार, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या मालकावर मारहाण केल्याचा आरोप

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हनी सिंगविरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रॅपर आणि त्याच्या टीमने इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या मालकावर प्राणघातक हल्ला, अपहरण केल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

गुरुवारी (दि. 20 एप्रिल)ला माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कार्यक्रम रद्द करण्यावरून झालेल्या वादानंतर रॅपरवर हे आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, हनी सिंगविरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. गायकाविरुद्धच्या तक्रारीत लावण्यात आलेल्या आरोपांची पोलिस चौकशी करत आहेत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

तक्रारदार पाेलिसांसमाेर राहिला गैरहजर
इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या मालकाने बुधवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिस ठाण्यात तक्रारदार म्हणून लेखी तक्रार दाखल केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘इव्हेंट एजन्सीच्या मालकाने हनी सिंग आणि त्याच्या टीम सदस्यांवर अपहरण आणि मारहाणीचा आरोप केला आहे. तक्रार दिल्यानंतर बीकेसी पोलिसांनी तक्रारदाराला आज बोलावून घेतले. मात्र, तो पोलिसांसमोर हजर झाला नाही.’

शाेरद्द केल्यानंतर हनी सिंगच्या टीमचे इव्हेंट कंपनीच्या मालकाशी गैरवर्तन
अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पोलिस तक्रारीची पडताळणी करत आहेत आणि अद्याप या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.’ माध्यमातील वृत्तांनुसार, हनी सिंगचा फेस्टिव्हिना कार्यक्रम मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम 15 एप्रिल रोजी होणार होता, परंतु पैशाच्या व्यवहारातील त्रुटीमुळे, इव्हेंट कंपनीच्या मालकाने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हनी सिंग आणि त्याच्या टीमच्या सदस्यांनी इव्हेंट कंपनीच्या मालकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.(bollywood singer yo yo honey singh his team members for assaulting event management agency owner)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आकांशा दुबेचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल म्हणाली, ‘मला काही झाल्यास त्याला जबाबदार…’
सलमानच्या लूकने नव्हे तर घड्याळाने वेधले चाहत्यांचे लक्ष, किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा