Friday, April 19, 2024

कोर्टाने चांगलेच फटकारल्यानंतर यो यो हनी सिंग सुनावणीला हजर; पती- पत्नीचे झाले काऊन्सिलिंग

भांडण, मतभेद आणि मग घटस्फोट, या सर्वांपासून बॉलिवूड काही वंचित नाही. बॉलिवूडमध्ये अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते आणि गायक हे सर्व बॉलिवूडशी जोडलेले आहेत. यामध्ये काही टक्के व्यक्ती सोडले, तर जवळजवळ सर्वांच्याच आयुष्यात आपल्या जोडीदारावरून समस्या आहेत. यामध्ये अनेकवेळा महिलांवरील अनेक अत्याचार समोर येतात. जेव्हापासून जागरूकता वाढू लागली आहे, तेव्हापासून महिला आपल्या आयुष्यात असलेल्या समस्येसाठी न्यायालयाचे दार ठोठावतात. बॉलिवूड रॅपर यो यो हनी सिंगची पत्नीदेखील आता न्यायालयाच्या दारी न्याय मागत आहे.

रॅपर हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शालिनीने त्याच्यावर कौटुंबिक अत्याचार, मानसिक त्रास आणि आर्थिक पिळवणुकीचे आरोप केले आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून यावर दिल्ली न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी (३ सप्टेंबर) हनी सिंग न्यायालयात दाखल झाला. यावेळी हनी सिंग आणि शालिनी तलवारमध्ये काऊन्सिलिंग करण्यात आले. न्यायालयामध्ये तब्बल १ तास २० मिनटे काऊन्सिलिंग सुरू होते.

न्यायालयामध्ये शालिनी तलवारच्या बाजूने एक दिलासादायक निर्णय
एक तासाहूनही जास्त वेळ सुरु असलेल्या काऊन्सिलिंगमध्ये न्यायालयाने शालिनीला आपल्या पतीच्या घरून तिचं सामान घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच शालिनीने २० कोटींची मागणी करत मागील सुनावणीमध्ये म्हटलं होत की, “माझ्याकडे आता कोणतेच साधन उरलेले नाही. मी माझ्या आयुष्यातील १० वर्षे या व्यक्तीवर घालवली आहेत. मी नेहमी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिले, आणि आता त्याने मला सोडून दिले आहे.” दम्यान शुक्रवारी (३ सप्टेंबर) झालेल्या सुनावणीत अंतरिम १० कोटी रुपये देण्यात यावे या मागणीवर ती ठाम आहे. यावर २८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

हनी सिंगने न्यायालयाला दिले ‘हे’ उत्तर
मागील तारखेला हनी सिंग न्यायालयात हजर नव्हता. त्यावर न्यायालयाने त्याला मेडिकल सर्टिफिकेट आणि मालमत्तेचा पुरावा सादर करायला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने मागितलेल्या सर्व माहितीसह ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये हनी सिंग म्हणाला की, “माझी तब्येत ठीक नसल्याने मी मागील तारखेला हजर राहू शकलो नाही.”

हनी सिंग हा एक प्रसिद्ध रॅपर आहे. त्याने आपल्या गाण्यांनी लाखो तरुणांची मने जिंकली आहेत. परंतु त्याच्या कौटुंबिक वादामुळे सध्या नेटकऱ्यांकडून त्याला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. या सर्वांवर न्यायालयाने शालिनी तलवारला त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

हे देखील वाचा