अभिनेत्री सोनल चौहानने बॉलिवूडमध्ये जास्त चित्रपट केले नाहीत, तरीही सोशल मीडियावर अभिनेत्रीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. ती बऱ्याचदा आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच समोर आलेला अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका मंदिराबाहेरच्या मुलांमध्ये खाण्याच्या वस्तू देताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा व्हिडिओ मुंबईच्या जुहू येथील एका मंदिराचा आहे. चाहत्यांना अभिनेत्रीचा हा व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसत आहे. दुसरीकडे मात्र तिला ट्रोलही केले जात आहे. काही युजर्स म्हणत आहेत की, ही एक प्रकारची पब्लिसिटी आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेत्रीने राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. ती मंदिराच्या बाहेरील गरीब मुलांना आणि स्त्रियांना बिस्कीट देत आहे. यामुळे तेथील लोकांच्या चेहऱ्यावर आलेला आनंदही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोनलचा हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शनि मंदिराच्या बाहेर सोनल चौहान.” तसेच, सोनलच्या या व्हिडिओवर नेटकरीही भरभरून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एकीकडे तिच्या कामाची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे काही नेटकरी तिला ट्रोल करत पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘बिस्कीटने काय होणार आहे? कमीत कमी एका वेळचे जेवण तरी दे. याने पोट भरणार आहे का?’ याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ‘आधी तुझे केस सांभाळ.’
बॉलिवूडचे जवळजवळ सर्व कलाकार कोरोनाच्या या संकटात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. ते लोकांना प्रत्येक शक्य त्या मार्गाने मदत करत आहेत. यावेळी सोनलने केलेले हे छोटेसे योगदानही खूप महत्त्वाचे आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर सोनल २००८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘जन्नत’ या चित्रपटाने प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी इमरान हाश्मीसोबत तिची जोडी चांगलीच पसंत केली गेली होती. याशिवाय ती ‘पहला सितारा’, ‘रेनबो’, ‘३जी’, ‘बूड्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त सोनलने दक्षिणेच्याही बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मुन्नी’ स्वत:लाच म्हणाली ‘फुलांपेक्षा सुंदर’, नेटकऱ्यांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच