Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड मराठी, कश्मिरीपासून ते पंजाबी लोकगीतं, ज्यांनी हिंदी सिनेमातील संगीताला लावले चार चॉंद

मराठी, कश्मिरीपासून ते पंजाबी लोकगीतं, ज्यांनी हिंदी सिनेमातील संगीताला लावले चार चॉंद

भारत विविध संस्कृतींनी संपन्न असा देश आहे. असं म्हणतात आपल्या देशात दर किलोमीटरवर भाषा बदलते. यात अजून एका गोष्टीची भर घालून असे म्हणावे लागेल की भाषेसोबत, संस्कृतीदेखील बदलते. खूप मोठा फरक पडतो असे काही नाही पण फरक तर नक्कीच पडतो. आपल्या देशात जितके राज्य तितक्या संस्कृती आणि या संस्कृतींमध्ये देखील काही उप संस्कृती देखील आहे. जसं आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. आत लावणी सोबतच भारूड, भाव गीते, पोवाडा, भजन, नाट्यसंगीत असे अनेक प्रकार आहेत. यालाच लोकसंगीत म्हणजेच फोक सॉन्ग म्हणतात.

आपल्या हिंदी सिनेमांवर अशा फोक सॉंग्सचा खूप मोठा पगडा पाहायला मिळतो. अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला फोक सॉन्ग पाहायला देखील मिळतात. हिंदी सिनेमांची पोहोच खूप असल्याने अशा सिनेमांमधून जेव्हा फोक सॉंग्स प्रेक्षकांसमोर येते, तेव्हा त्यांना देखील या गाण्याबद्दल माहिती मिळते आणि एखाद्या राज्यापुरता मर्यादित असणारी ही गाणे देशाच्या किंबहुना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहतात. या गाण्यांना प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो. आज या लेखातून आपण अशाच काही फोक सॉंग्सची माहिती घेणार आहोत.

नवराई माझी:
श्रीदेवी यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातील ‘नवराई माझी लाडाची गं’ हे प्रचंड हिट झाले. हे एक महाराष्ट्रीयन लोकसंगीत असून, अनेक महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये हे गाणे वाजवले जाते. नीलांबरी किरकिरे, स्वानंद किरकिरे, सुनिधी चौहान आणि न्याटली दि लुशियो यांनी हे गाणे गायिले आहे.

जुगनी :
कॉकटेल सिनेमातील ‘जुगणी’ हे गाणे देखील पंजाबी फोक सॉन्ग आहे. दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘कॉकटेल’ सिनेमातील अरिफ लोहार यांनी गायलेले हे गाणे खूप गाजले.

गेंदा फूल :
रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील ‘दिल्ली ६’ सिनेमातील ‘ससुराल गेंदा फुल’ हे गाणे छत्तीसगढ मधील फोक सॉन्ग आहे. हे गाणे छत्तीसगढ मधील स्त्रिया जेव्हा नवरा कामावरून येण्याची वाट पाहतात, तेव्हा गातात.

दिलबरो:
आलिया भट्टच्या सुपरहिट सिनेमा असलेल्या ‘राजी’ सिनेमातील हे गाणे तुफान हिट झाले. शंकर महादेवन, हर्षदीप कौर आणि विभा सराफ यांच्या आवाजातील हे गाणे काश्मिरी फोक सॉन्ग आहे. मुलींच्या लग्नानंतर होणाऱ्या विदाईच्या वेळी हे गाणे गायिले जातात.

बुमरो :
‘मिशन काश्मीर’ सिनेमातील प्रीती झिंटा आणि हृतिक रोशन यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे देखील काश्मिरी फोक सॉन्ग आहे. जे काश्मिरी लग्नातील मेहेंदीच्या वेळी गातात. सुनिधी चौहान, शंकर महादेवन, जसपिंदर नरूला यांच्या आवाजातील हे गाणे सुपरहिट झाले होते.

 

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा