Friday, July 5, 2024

कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात एकच हाहाकार माजला आहे. कोरोना संक्रमणाचा धोका आणि प्रकरणं वेगाने वाढत आहेत. रुग्णालयात कोरोना रुग्णांची गर्दी होत आहे आणि काही रुग्ण बेड उपलब्ध नसल्यामुळे आपला जीवही गमावत आहेत. मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

या कठीण काळात बॉलिवूडचे कलाकार पुढे येत आहेत आणि गरजूंना मदत करत आहेत. परंतु पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या मदतीला धावून आलेला सोनू सूद, आता दिल्लीची अवस्था पाहून अस्वस्थ झालेला दिसत आहे. अलीकडेच, दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था पाहिल्यानंतर, त्याने एक ट्वीट केले आहे, जे सध्या व्हायरल होत आहे.

दिल्लीतील वेदनादायक फोटोंचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने एक ट्वीट केले आहे. देशाच्या राजधानीच्या लोकांकडून सातत्याने मागितल्या जाणाऱ्या मदतीपुढे, तो असहाय्य दिसत आहे. त्याने एका ट्विटमध्ये आपली असहाय्यता व्यक्त केली आहे. आपली चिंता व्यक्त करताना, सोनू सूदने ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, “सध्या दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे आहे, पण रुग्णालयात बेड शोधणे कठीण आहे. पण बेड सापडेल, फक्त धैर्य नका सोडू!”

वास्तविक दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या जिल्ह्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनत चालली आहे. रुग्णालयांमध्ये रुग्ण बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत, मसीहा बनलेल्या सोनूकडे कोणी बेडसाठी, तर कोणी ऑक्सिजन सिलिंडरसाठी मदत मागत आहे.

नुकताच अभिनेत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे विनवणी करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे आवाहन केलेले पाहायला मिळाले. तो म्हणाला की, “या मुलांचे शिक्षण खासगी किंवा सरकारी शाळांमध्ये व्हावे, बॅचलर डिग्री असो मेडिकल किंवा इंजिनीअरिंग असो, सर्व अगदी विनामूल्य असावे. जेणेकरून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप

-‘मलाही राग आला होता…’, म्हणत हिमांश कोहलीने पहिल्यांदाच केला नेहा कक्करसोबतच्या ब्रेकअपवर खुलासा

-‘नृत्याने अंधार आणि वेदनाविरुद्ध लढण्यास मिळते मदत’, म्हणत अभिनेत्री संदीपा धरने नृत्य दिनानिमित्त केला आयुष्यातील मोठा खुलासा

हे देखील वाचा