कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे दोघे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. आता संकेत भोसलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या लग्नाआधी झालेल्या, हळदीच्या समारंभाचा आहे. यात सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले जोरदार नाचताना दिसत आहेत. या निमित्ताने त्यांचे खास मित्र आणि कुटुंबातील सदस्यही पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, सुगंधा आणि संकेत यात भांगडा नृत्य करताना दिसले आहेत.
संकेत भोसलेने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर बर्याच कमेंट्स आणि लाईक्स येत आहेत. त्या दोघांचे चाहते या हळदी समारंभाच्या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ शेअर करत संकेत भोसलेने लिहिले की, ‘जदो नाचे विवाह वाला मुंडा.’
या व्हिडिओत सुगंधाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी संकेतने पांढर्या रंगाचा कुर्ता आणि पायजामा परिधान केलेला पाहायला मिळाला. यात पूर्णवेळ तो खूपच आनंदित दिसत होता.
नुकतेच सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले या जोडप्याने आपल्या लग्नाचेही काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी सुगंधा एक सुंदर लेहंग्यामध्ये पाहायला मिळाली, तर संकेत शेरवानी परिधान केलेला दिसला. तसेच, काही दिवसांपूर्वीच सुगंधाने सांगितले होते की, लग्न मंगळवारी २६ एप्रिल रोजी, पंजाबच्या जालंधरमध्ये होणार आहे, जिथे सुगंधा मिश्राचे घर आहे.
सुगंधा मिश्रा असेही म्हणाली होती की, हसणे हे एक उत्तम औषध आहे आणि संकेत तर एक डॉक्टर देखील आहे. विशेष म्हणजे सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे दोघेही विनोदवीर आहेत आणि टीव्हीवर खूप लोकप्रिय आहेत. तो नेहमी आपल्या मिमिक्रीने सर्वांना हसवतो. दोघांनी बर्याच लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. याशिवाय दोघांनी एकमेकांसोबतही काम केले आहे. दोघांची केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी आहे. हे जोडपे अनेकदा त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात जे बरेच व्हायरलही होतात. तसेच, दोघांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-