Monday, July 1, 2024

फिटनेसच्या बाबतीत आई सुष्मिता सेनलाही टक्कर देतेय मुलगी रेनी सेन, फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने जगाला दाखवून दिले आहे की, आई होण्यासाठी लग्न करणे आवश्यक नसते. तिने हे देखील सिद्ध केले की, दत्तक घेण्याद्वारेही आपल्या जीवनात आनंद येऊ शकतो. आज सुष्मिता दोन लाडक्या मुलींची अभिमानी अविवाहित आई आहे.

दोन्ही मुली रेनी आणि अलीशा तिच्या खूप जवळ आहेत. रेनी सेन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यासोबतच ती तिच्या आईला तंदुरुस्ती आणि सौंदर्याच्या बाबतीत जोरदार टक्कर देतानाही दिसत आहे. अलीकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे.

रेनी सेनने नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये, तिने आपले टोन्ड बॉडी फ्लाँट केली आहे. फोटोत तिने ट्यूब आणि शॉर्ट्स परिधान केले आहेत आणि ती आरशात सेल्फीसाठी पोझ देताना दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, “मी वर्कआउट्स आणि पिझ्झा यांच्यात अडकली आहे.”

रेनीने जरी या फोटोवरील कमेंट सेक्शन बंद केले असले, तरीही युजर्स पोस्ट लाईक करून, या फोटोला पसंती दर्शवत आहेत. रेनीच्या आईला म्हणजेच सुश्मिता सेनलाही आपल्या मुलीचा हा लूक आवडला आहे. तिनेही फोटोला लाईक करून, आपले प्रेम व्यक्त केले आहे.

रेनी सेन ही सुष्मिता सेनची मोठी मुलगी आहे. २००० मध्ये तिने रेनीला दत्तक घेतले होते. रेनीलाही सिनेमात कारकीर्द करायची ईच्छा आहे. तिने या वर्षाच्या सुरुवातीला ‘सुट्टाबाजी’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. याचे दिग्दर्शन कबीर खुराना यांनी केले होते. मामी चारू असोपाच्या गरोदरपणाबद्दल प्रतिक्रिया दिल्याबद्दल रेनी काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा