बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझेन खान बर्याचदा चर्चेत असते. सुझेन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सुझेन बर्याचदा आपले अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. दरम्यान, सुझेनने तिच्या सोशल मीडियावरून आणखी एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यावर तिचा कथित प्रियकर अर्सलान गोनी यानेही कमेंट केली आहे.
सुझेन खानने तिच्या एका प्रोजेक्टचे काही सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहेत. ज्याबद्दल अर्सलान गोनी यानेही कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. अर्सलानने कमेंटमध्ये ‘तेज,’ असे लिहिले आहे. या कमेंटनंतरच या दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे.
ऋतिक रोशन आणि सुझेन खानच्या घटस्फोटानंतरही ते दोघेही चांगले मित्र आहेत. सुझेन नेहमीच ऋतिकबरोबर वेळ घालवताना दिसली आहे. दोघे एकत्र मुलांची काळजी घेताना दिसतात. अशी बातमी होती की, ऋतिक आणि सुझेन पुन्हा एकत्र येऊ शकतात, पण चर्चेवरून सुझेन आणि अर्सलानच्या बातम्या आता रंगत आहेत.
सुझेन खानच्या नात्याची चर्चा ‘बिग बॉस १४’ चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ अर्सलान गोनीशी चर्चा होताना दिसत आहे. एका वेबसाईटनुसार सुझेन आणि अर्सलान खूप चांगले मित्र आहेत, आणि एकमेकांसमवेत वेळ घालवतात. टीव्हीच्या जगाशी जोडलेले त्यांच्या काही मित्रांमार्फत सुझेन आणि अर्सलान यांची भेट झाली. काही काळापूर्वी दोघांमधील जवळीक वाढली आहे. त्या दोघांनीही अधिकृतपणे अद्याप काहीही सांगितले नाही.
टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या मित्रांसह अर्सलान आणि सुझेन हे दोघेही बर्याच वेळा एकत्र फिरताना दिसले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलताना, अर्सलानने सन २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुझेन एक सुप्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. ‘द चारकोल प्रोजेक्ट’ नावाने तिने स्वत: चा इंटिरियर डिझाइन स्टुडिओही बनविला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-