Monday, July 1, 2024

प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, कलाविश्वावर शोककळा

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. अभिनेत्री 78 वर्षाच्या हाेत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोसाठी त्या लोकप्रिय होत्या.

तबस्सुम गोविल ( Tabassum Govil ) कधीही सिनेविश्वातील कोणत्याही ओळखीवर अवलंबून राहिल्या नाही. त्यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी अयोध्येत झाला. मात्र, अभिनेत्रीचे शिक्षण मुंबईत झाले. तबस्सुमने अगदी लहान वयातच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. जेव्हा त्या पहिल्यांदा पडद्यावर दिसल्या तेव्हा त्या फक्त 3 वर्षांच्या होत्या. 1947 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेरा सुहाग’ चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तबस्सुम यांनी ‘दीदार’ चित्रपटात नर्गिसची बालपणीची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर त्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्यात.

सिनेमाशिवाय टीव्हीच्या दुनियेतही तबस्सुम यांचे नाव खूप उंचावले आहे. त्यांनी पहिला भारतीय टेलिव्हिजन टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ सुरू केला. या शोमध्ये त्या सिने जगताशी संबंधित लोकांशी खास संवाद साधायच्या. अभिनेत्रीच्या या शोला खूप प्रेम मिळाले. या कारणास्तव हा कार्यक्रम एक-दोन नव्हे तर 21 वर्षे दूरदर्शनवर प्रसारित झाला. हा शो 1972 मध्ये सुरू झाला आणि 1993 पर्यंत चालला. (bollywood tabassum govil passes away famous actress tabassum govil is no more died at the age of 78)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
वेस्टर्न कपडे परिधान करणाऱ्या भारतीय महिलांवर जया बच्चन यांनी उपस्थित केले प्रश्न, वाचा संपूर्ण बातमी

एक्स बॉयफ्रेंडने सुश्मिताला दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियावर फोटो होतोय तुफान व्हायरल

हे देखील वाचा