Tuesday, May 28, 2024

वेस्टर्न कपडे परिधान करणाऱ्या भारतीय महिलांवर जया बच्चन यांनी उपस्थित केले प्रश्न, वाचा संपूर्ण बातमी

बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन अनेकदा सामाजिक विषयांवर आपले विचार मांडतात. आता त्यांनी वेस्टर्न  कपडे परिधान करणाऱ्या महिलांबाबत मत व्यक्त केले आहे. जया बच्चन अनेकदा पॅपराझींवर चिडताना दिसतात. त्या स्वतःला एक स्ट्रांग फेमिनिस्ट म्हणून देखील वर्णन करतात. त्याचबराेबर ते अनेकदा आपले मत मांडतानाही दिसतात.

आता नव्या नवेली नंदा (Navya) हिने आजी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची पाॅडकास्ट मुलाखत घेतली आहे. यामध्ये त्यांनी भारतीय महिलांच्या फॅशन सेन्सवर भाष्य केले आहे. यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहे. लोक भारतीय कपड्यांऐवजी वेस्टर्न कपडे का पसंत करतात, हे मला समजत नसल्याचे जया बच्चन यांनी म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @ivmpodcasts

जया बच्चन म्हणतात, “मला असे वाटते की, विदेशी कपड्यांमुळे महिलांना पुरुषांसारखेच अधिकार मिळतात, पण महिलांनी त्यांची स्त्रीशक्ती दाखवावी असे मला वाटते. जा आणि साडी नेस असे मी म्हणत नाही, पण परदेशात स्त्रियाही कपडे घालतात. हा सगळा बदल तेव्हा झाला जेव्हा महिलांनी पॅंट घालायला सुरुवात केली.” यावर जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन म्हणते की,”पँट घातल्याने महिलांना फिरणे आणि काम करणे सोपे जाते.” ती म्हणतो, “आपण कुठेही सहज येऊ शकतो. अनेक महिला घरी नसतात, बाहेर जातात. त्यांना काम असते. साडीचा पल्लू फिक्स करत राहण्यापेक्षा पॅंट आणि टी-शर्ट घालणे खूप सोपे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @ivmpodcasts

नव्या नवेली नंदा यांनी यावेळी अनेक महिला सीईओबद्दल सांगितले ज्यांना साडी नेसणे आवडते. यावर जया बच्चन म्हणाल्या की, “त्या असे करतात कारण, त्या सेल्फ मेड आहे आणि त्यांचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.” जया बच्चन यांनी एखाद्या विषयावर आपले मत मांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी असेही सांगितले होते की, “त्यांना त्यांच्या मासिक पाळीत शूट करणे कठीण जात असे.”

जया बच्चन लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. पुढील वर्षी 23 एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. (bollywood Actress jaya bachchan raised questions on indian women wearing western clothes in what the hell navya podcast show)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
फॅन असावी तर अशी शहनाजला भेटण्यासाठी चाहतीने केले सात समुद्र पार, पाहा भन्नाट व्हिडिओ

लेक आयराच्या साखरुपुड्यात बेधुंद थिरकला आमिर खान, पहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा