छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शाहबाज खान हे आज (10 मार्च) त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘टिपू सुलतान’ या मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणाऱ्या अभिनेते ‘चंद्रकांता’ या मालिकेमुळे घरोघरी ओळख जाऊ लागले.पण त्यांचे संगीताशीही खास नाते आहे, हे तुम्हांला माहित आहे का? चला तर मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या विषयी रंजक गोष्टी जाणून घेऊ…
टीव्हीच्या दुनियेतील खलनायकाचा विचार केला की मनात सर्वात आधी शाहबाज खान यांचे नाव येते. अनेक टीव्ही मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग आज शाहबाज खानच्या वाढदिवसानिमित्त टीव्हीच्या या सुप्रसिद्ध चेहऱ्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया
शाहबाज खानला ‘टिपू सुलतान’ या मालिकेतून करिअरमधील पहिला ब्रेक मिळाला. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर शाहबाज खान ‘चंद्रकांता’ या मालिकेत ‘कुंवर विक्रम सिंह’ यांच्या भूमिकेत दिसला होता. या व्यक्तिरेखेने त्यांचे घराघरात नाव पोहोचले. ‘चंद्रकांता’ मालिकेमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर हा अभिनेता एका पाठोपाठ मालिकांमध्ये सशक्त पात्रांमध्ये दिसला.
शाहबाज खान हे संगीतमय घराण्यातील आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. वास्तविक, ते अभिनेता दिवंगत उस्ताद आमिर खान यांचा मुलगा आहे. अगदी लहान वयात त्यांनी वडिलांना गमावले. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत शाहबाजने सांगितले होते की, जेव्हा त्यांचे वडील उस्ताद अमीर खान यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 9 वर्षांचा होते.
वडिलांच्या निधनानंतर शाहबाज खान यांच्या आईने त्यांना संगीतात करिअर करू दिले नाही. त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले. ते अनके चित्रपटांमध्ये दिसला आहे. सनी देओलच्या ‘द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय ते अभिनेता सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातही दिसले आहे. मात्र, त्यांना चित्रपटांमधून फारशी ओळख मिळवता आली नाही.
चित्रपटांमध्ये यश न मिळाल्याने या त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीत काम केले. ‘नागिन’, ‘राम सिया के लव कुश’, ‘दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली’, ‘तेनाली राम’, ‘संतोषी मां’, ‘महाराणा प्रताप’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे. (bollywood-television-actor-shahabaj-khan-birthday-special-story)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा विद्या बालनने पहिल्यांदा ऐकली होती ‘पा’ची स्क्रिप्ट अ’शी’ होती तिची प्रतिक्रिया
कॉमेडीची क्वीन असलेल्या भारती सिंगने देखील केला बॉडी शेमिंगचा सामना, विविध नावांनी उडवायचे तिची टिंगल










