Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील प्रसिद्ध ३-३ भावांच्या जोड्या, कोणी झाले सुपरहिट, तर कोणी फ्लॉप

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ३-३ भावांच्या जोड्या, कोणी झाले सुपरहिट, तर कोणी फ्लॉप

बॉलिवूड जगात अशा काही भावंडांच्या जोड्या होऊन गेल्या, ज्यांनी या बॉलिवूड जगताला प्रसिद्धीच्या उंचीवर नेऊन ठेवले. सोबतच सगळीकडेच वाहवा मिळवली आहे, परंतु यातील काही जोड्या मात्र फ्लॉप ठरल्या. आज आपण बॉलिवूडमधील अशाच भावंडांच्या जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत.

देव आनंद, चेतन आनंद आणि विजय आनंद
या यादीत सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे, एव्हरग्रीन सुपरस्टार देव आनंद, चित्रपट निर्माते चेतन आनंद आणि विजय आनंद होय. यातील देव आनंद आणि चेतन आनंद यांनी भरपूर यश मिळवले. मात्र, त्यांचे भाऊ विजय आनंद यांना चित्रपटांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला.

महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट
गेल्या अनेक काळापासून हे ३ भावंडे चित्रपट कारकिर्दीत आहेत. ते म्हणजे, महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट होय. त्यांची जोडी बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मितीवर काम करत आहे. हे तीनही भाऊ आपल्या कारकीर्दीत खूप यशस्वी झाले आहेत. महेश भट्ट हे तीन भावांमध्ये सगळ्यात मोठे आहेत.

फिरोज खान, संजय खान आणि अकबर खान
फिरोज खान, संजय खान आणि अकबर खान हे एकाच वेळी टॉप स्टार होते. ते बॉलिवूडचे पहिले खान ब्रदर्स म्हणून ओळखले जातात. हे तीन भाऊ यशस्वी अभिनेतेच नव्हे, तर यशस्वी दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मातेही होते.

अमरीश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी
फारच थोड्या चाहत्यांना माहिती असेल की, हिंदी सिनेमात अमरीश पुरी, चमन पुरी आणि मदन पुरी हे भावंडेही यशस्वी ठरले आहेत. अमरीश पुरी यांचे भाऊ चमन पुरी आणि मदन पुरी यांनीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहेत. अमरीश पुरी यांच्या खलनायकाची भूमिका खूप पसंतीस उतरली, तर दुसरीकडे, अमरीश पुरींचे भाऊ मदन पुरी यांनीही बर्‍याच वर्षांपासून उत्तम कामगिरी करून नाव कमावले आहे. अभिनेते मदन पुरी यांनी बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 किशोर कुमार, अनूप कुमार आणि अशोक कुमार
आता आपण ज्या तीन भावांबद्दल बोलणार आहोत, त्यांपैकी दोन भाऊ अभिनेते म्हणून पुढे आले, तर एक भाऊ मोठे गायक होते. ते तीन भाऊ म्हणजेच किशोर कुमार, अनूप कुमार आणि अशोक कुमार होय. हे तिघे भाऊ ‘चलती का नाम गाडी’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसले होते. किशोर कुमार हे आपल्या काळातील सर्वात प्रसिद्ध गायक आणि अभिनेते होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

-एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा