टाइगर श्रॉफने केला भन्नाट डान्स, पण नेटकऱ्यांचे लक्ष वेधले ते दिशा पटानीच्या कमेंटने; पाहा व्हिडिओ आणि तिची खास कमेंट

टाइगर श्रॉफने केला भन्नाट डान्स, पण नेटकऱ्यांचे लक्ष वेधले ते दिशा पटानीच्या कमेंटने; पाहा व्हिडिओ आणि तिची खास कमेंट


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या काम आणि चित्रपटांद्वारे लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमीच जबरदस्त स्टंट आणि अ‍ॅक्शन सीन्स असतात आणि प्रेक्षकांनाही ते बरेच आवडतात. त्याचप्रमाणे, त्याचे डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होत असतात.

टायगर श्रॉफने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यात आपण त्याला नाचताना पाहू शकतो. तो डान्स पार्टनरबरोबर त्याच्या ‘सिंगल अनबीलिवेबल’वर नाचत आहे. या व्हिडिओवर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी यांनी कमेंट केली आहे. तिने टायगर श्रॉफच्या या डान्स व्हिडिओचे कौतुकही केले आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या डान्स पार्टनर परेश प्रभाकर शिरोडकर याला व्हिडिओत टॅगही केले आहे. त्यात त्याने अशा काही स्टेप्स केल्या आहेत ज्यांना जबरदस्त नियंत्रणाची आवश्यकता आहे. व्हिडिओ पाहून दिशा पटानीने कमेंट बॉक्समध्ये एक इमोजी पोस्ट केला आहे. त्याचवेळी, कृष्णा श्रॉफने ‘ब्रूह’ असे लिहिले आहे.

दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदरही तिने बर्‍याच प्रसंगांवर टायगर श्रॉफचे कौतुक केले आहे. ते दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसले जातात. अलीकडेच, दोघांना एक फुटबॉल सामन्यात पाहिले गेले होते. त्या ठिकाणी टायगर श्रॉफ जखमी झाला होता आणि दिशा पटानी त्याच्याबाबत काळजी व्यक्त करताना दिसली.

त्याच बरोबर, टायगर श्रॉफ देखील दिशा पटानीच्या व्हिडिओवर मजेदार कमेंट देत राहतो. हे दोघेही एकत्र वेळ घालवण्यासाठी फिरायला जातात, पण अद्याप दोघांनीही त्यांचे नाते सार्वजनिक केले नाही. टायगर श्रॉफ लवकरच ‘गणपत’ आणि ‘हीरोपंती’ या चित्रपटात दिसणार आहे. तर दिशा पटानी सलमान खानच्या ‘राधे’ आणि ‘मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.