Wednesday, July 3, 2024

सचिनची मुलाखत घेणारा क्रीडा पत्रकार ते दिग्गज हिंदी अभिनेता; असा होता टॉम अल्टर यांचा जीवनप्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे अनेक अभिनेते झाले आहेत, ज्यांना चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी लाेक स्मरणात ठेवते. टॉम अल्टर हे देखील त्यामधूनच एक आहेत. दिसायला फाॅरेनर पण मनाने हिंदुस्थानी असणाऱ्या, टॉम अल्टरने चार दशकांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, 29 सप्टेंबर 2017 रोजी कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. अशात 22 जून रोजी त्यांची जयंती आहे. यानिमित्ताने, अभिनेता होण्याआधीचे त्यांचे वैयक्तिक आयुष्य, तसेच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या काही उत्कृष्ट भूमिकांबद्दल जाणून घेऊयात…

टॉम अल्टर (tom alter) यांचा जन्म 22 जून 1950 रोजी उत्तराखंडमधील मसुरी येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दोन भागात विभागले गेले. त्यांचे आजी-आजोबा 1916 मध्ये अमेरिकेतून मद्रास येथे स्थलांतरित झाले आणि काही वर्षांनी लाहोर, पाकिस्तान येथे स्थायिक झाले. फाळणीनंतर टॉम अल्टरच्या आजी-आजोबांनी पाकिस्तानमध्ये राहणे पसंत केले आणि त्यांचे पालक भारतात स्थलांतरित झाले.

टॉम अल्टर पूर्ण फाॅरेनरसारखे दिसत हाेते, पण त्याच्या दिसण्याच्या विपरीत, ते हिंदी बोलण्यात इतके चांगले हाेते की, त्यांना भारताचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हटले गेले. टॉम ऑल्टरची हिंदी सोबतच उर्दू भाषेवरही पक्की पकड होती. टॉम ऑल्टर हे 1980 ते 1990च्या दशकात क्रीडा पत्रकार देखील राहिले. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असताना टीव्हीवर मुलाखत घेणारे ते पहिले पत्रकार होते.

टॉम ऑल्टरने राजेश खन्ना यांचा ‘साधना’ पाहिल्यानंतर अभिनेता होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. ते पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या थिएटरमध्ये रुजू झाले आणि तेथून त्यांनी अभिनयाचे बारकावे शिकले. टॉम ऑल्टरचा हा निर्णय योग्य ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून त्यांना प्रचंड यश मिळाले. त्याची उंची आणि दिसणे असे होते की, छोट्या भूमिकेतही त्याच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करणे कठीण होते.

टाॅम आॅल्टर यांनी त्यांच्या अभिनय काराकिर्दत अनेक दमदार चित्रपट केली, ज्यामध्ये ‘सत्यजीत रे’,’परिंदा’, ‘वीर-झारा’ या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल टॉम अल्टर यांना 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टॉम अल्टर यांचा शेवटचा चित्रपट त्यांच्या मृत्यूच्या 2 वर्षांनंतर प्रदर्शित झाला, त्याचे टायटल हाेते ‘किताब’. ही एक शॉर्ट फिल्म आहे. (bollywood tom alter actor birth anniversary special know about his most memorable characters in shatranj ke khiladi gandh ilike films)

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
मानधन घेताना रजनीकांत यांनाही टक्कर देतो थालापती विजय, कुण्या अभिनेत्रीसोबत नाही तर चक्क फॅनसोबत केलंय लग्न

हे देखील वाचा