इतर प्रादेशिक चित्रपट इंडस्ट्रीच्या तुलनेत नक्कीच बॉलिवूड इंडस्ट्री ही भारतात सर्वात मोठी मानली जाते. शिवाय प्रादेशिक सिनेमांपेक्षा बॉलिवूड चित्रपटांचे महत्त्व नक्कीच जास्त आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून हे समीकरण बदलताना दिसत आहे. हिंदी सिनेमांना साऊथ सिनेमे तोडीस तोड टक्कर देताना दिसत आहेत. कधीकधी जाणवते की, साऊथ इंडस्ट्री बॉलिवूडच्या पुढे आहे. आज संपूर्ण जगात टॉलिवूडने त्यांचा एक वेगळा प्रेक्षक तयार केला आहे. बॉलिवूडच्या कलाकरांना या साऊथ इंडस्ट्रीमधील कलाकार लोकप्रियतेच्या बाबतीत जोरदार टक्कर देतात.
याच साऊथ इंडस्ट्रीतल्या कलाकरांना जगभर ओळख मिळाली आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय जोसेफ हा देखील सध्याच्या घडीचा मोठा आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या आणि दमदार ऍक्शनच्या जोरावर मोठी प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळवले आहे. गुरुवारी (22 जून) विजय त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी.
साऊथ सुपरस्टार विजयने त्याच्या अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. विजयचे पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. मात्र, तो त्याच्या फॅन्समध्ये विजय म्हणूनच लोकप्रिय आहे. विजयने बहुतकरून तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयचे सिनेमे म्हणजे भरपूर ऍक्शन, ड्रामा आणि रोमान्स असलेले असतात.
विजयचा जन्म २२ जून, १९७४ रोजी चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक, तर आई शास्त्रीय पार्श्वगायिका शोभा चंद्रशेखर आहे. विजयला एक बहीण देखील होती. मात्र, ती दोन वर्षांची असताना तिचे निधन झाले. विजयने त्याचे संपूर्ण शिक्षण चेन्नईमधूनच पूर्ण केले आहे.
थालापती विजयने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर, त्याने त्याच्या वडिलांची निर्मिती असणाऱ्या ‘नालया थीरपू’ या १९९२ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातून मुख्य नायक ही भूमिका साकारत चित्रपटांमध्ये प्रवेश केला. या सिनेमाच्यावेळी विजय केवळ १८ वर्षांचा होता. या सिनेमानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. एका पेक्षा एक सरस चित्रपट देत त्याने रसिकांचे प्रेम मिळवले.
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाची सुरुवात विजय सोबतच केली होती. या दोघांनी तमिळ सिनेमा thamizhan सोबत केला होता. हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला. प्रियांका सोबतच विजयने श्रीदेवी यांच्यासोबतही काम केले आहे.
सन १९९६ मध्ये विजयचा Poove Unakkaga हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने त्याला तुफान लोकप्रियता तर दिलीच, सोबतच संपूर्ण जगभरात पसरलेल्या सर्व तमिळ लोकांचे प्रेमही मिळवून दिले. आजच्या घडीला विजय सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. विजय एक अभिनेता असण्यासोबतच उत्तम गायकही आहे. त्याने अनेक सिनेमांसाठी पार्श्वगायन केले आहे.
विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्याने संगीता नावाच्या मुलीसोबत लग्न केले आहे. या दोघांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. विजयने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र, त्याने लग्न त्याच्या एका फॅनसोबत केले. संगीता ही विजयची खूप मोठी फॅन होती. लंडनमध्ये राहणारी संगीता फक्त विजयला भेटायला भारतात आली. ती त्याला भेटल्यानंतर त्या दोघांमध्ये बोलणे झाले. त्याचदरम्यान दोघांनाही एकमेकांबद्दल काहीतरी खास जाणवले. पुढे काही काळाने विजयच्या वडिलांनी संगीताला त्यांच्या घरी बोलावले आणि लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. तिने देखील तो मान्य केला. विजय ख्रिश्चन, तर संगीता हिंदू असल्याने पुढे २५ ऑगस्ट, १९९९ साली या दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले. आज या दोघांना दोन मुलं आहेत.
Reservation starts from April 10 pic.twitter.com/Hv6AZDSAqk
— Vijay (@actorvijay) April 7, 2016
विजय हा सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणारा तामिळ अभिनेता आहे. त्याने आपल्या आगामी ‘थलापती ६५’ या चित्रपटासाठी तब्बल १०० कोटींचे मानधन घेतले आहे. मानधनात त्याने रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे. कारण रजनीकांत यांनी त्यांच्या ‘दरबार’ चित्रपटासाठी साठी ९० कोटी रुपये घेतले होते.
#Theri pic.twitter.com/9gQNF25dAI
— Vijay (@actorvijay) January 16, 2016
‘सेंढूरपांडी’, ‘विष्णू’, ‘वसंत वासल’, ‘लव टुडे’, ‘प्रियमुदन’, ‘काधालुक्कु मरियाधई’, ‘थिरुपाची’, ‘थिरुमलै’, ‘भगवती’, ‘सुकरन’, ‘पोक्किरी’, ‘मास्टर’ आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे. त्याच्या ‘मास्टर’ या चित्रपटाने कोरोना काळात सर्वाधिक कमाई करुन यशाचे नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. ‘मास्टर’ने रिलीजच्या काही दिवसांतच २०० कोटींचा व्यवसाय केला होता.
अधिक वाचा –
– खिशात 500 रुपये घेऊन मुंबईत आले, नाना पाटेकरांनी केलेली मोलाची मदत; मकरंद अनासपुरेंबद्दल तुम्हाला हे माहितीये का?
– अजितदादांच्या हस्ते ‘आठवणी’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च, जाणून घ्या चित्रपटाबद्दल सर्वकाही