किच्चा सुदीप (Kichcha Sudeepa) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांच्यात ट्विटरवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता मोठ्या वादात झाले आहे. आधी अभिनेत्यांची विधाने आणि नंतर राजकारण्यांची एंट्री, यामुळे हा देशव्यापी भाषिक चर्चेचा विषय बनला आहे. आता जवळपास एक महिन्यानंतर, सँडलवुड स्टार किच्चा सुदीपने आपल्या वक्तव्यावर मौन सोडले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ‘सर्व भारतीय भाषा भारतीयत्वाचा आत्मा आहेत’ या वक्तव्याचे कौतुक केले आहे.
काय म्हणाला किच्चा सुदीप?
भाषेच्या वादावर पंतप्रधान मोदींच्या स्पष्ट मताचे कौतुक करत, ४८ वर्षीय अभिनेता कन्नडमध्ये म्हणाला, “मला कोणताही वाद किंवा विवाद वाढवायचा नव्हता. जे काही झाले ते कोणत्याही अजेंडाशिवाय घडले. हे एक मत होते, ज्याला मी आवाज दिला. प्रत्येकासाठी त्यांची भाषा त्यांच्या आईसारखी असते. याचा अर्थ असा नाही की, आपण इतर भाषांचा आदर करत नाही किंवा अभिमान बाळगत नाही. पीएम मोदींचे हे शब्द ऐकून आनंद झाला.” (bollywood vs south cinema kichcha sudeepa lauds pm narendra modi appeal on language)
‘इतर भाषांचा अनादर करू नका’
पुढे अभिनेत्याने देशातील प्रत्येक भाषेच्या महत्त्वावर भर दिला आणि सांगितले की, प्रत्येक भाषेचा समान आदर करण्याची गरज आहे. तो म्हणाला, “भारतात सर्व भाषांना वेगळे स्थान आहे. इतर भाषांचा अनादर कोणीही करू शकत नाही. आपल्या भाषेचा सन्मान व्हावा असे वाटत असेल, तर इतर भाषांचाही आदर करायला शिकायला नको का?”
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
शुक्रवारी (२१ मे) जयपूरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये, आम्ही पाहिले आहे की, भाषांवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे. भाजपला प्रत्येक प्रादेशिक भाषेत भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. भाजपनेच प्रथमच भारताची संस्कृती आणि भाषा यांना राष्ट्राच्या सन्मानाशी जोडले आहे.”
दरम्यान देशभरात भाषेवरून चांगलाच वाद रंगलेला पाहायला मिळाला. या वादात सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनींही उडी घेतली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा