×

‘हिंदी राष्ट्रभाषा’ मुद्द्यावरून सुरु झालेल्या वादावरून ‘पान मसाला’ नावाने अजय देवगण होत आहे ट्रोल

हिंदी राष्ट्रभाषा वर सुरु झालेला दोन मोठ्या कलाकारांमधील वाद वाढतच आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि कन्नड स्टार किच्चा सुदीप यांच्यामध्ये होणाऱ्या या वाद्यांवर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, हा वाद सोशल मीडियावरही तुफान गाजत आहे. विविध सेलिब्रिटी या वादावर आपले मत देत असताना नेटकऱ्यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. या वादावर नेटकरी त्यांच्या भन्नाट आणि मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. सध्या या वादावर आधारित विविध मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच किच्चा सुदीप, हिंदी इज नॉट नॅशनल लँग्वेज, विमल आदी हॅशटॅग देखील ट्रेंड करत आहे.

या भाषा वादावर अनेक लोकांनी अभिनेता अजय देवगण आणि बॉलीवूडला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच अतिशय मजेशीर मीम्स देखील शेअर केले आहेत. तर काही लोक या दोन बड्या अभिनेत्यामध्ये सुरु झालेल्या भाषा वादाला संपवण्याची विनंती करताना दिसत आहे. या विषयांवर बोलताना एकाने लिहिले, “हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. तुझा सिनेमा रनवे ३४ प्रमोट करण्यासाठी ही ट्रिक वापरू नको. तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम, उडिया, बंगाली, इंग्लिश आदी सर्वच भाषा एकसमान आहे.”

तर एका युजरने लिहिले, “स्वतःला सेलिब्रिटी म्हणतो आणि भारतातली महत्वाच्या गोष्टी देखील माहित नाही. सर भारताची कोणतीच राष्ट्रभाषा नाही.” एकाने लिहिले, “तुझ्या करिअरमधील हिट सिनेमे जसे की दृश्यम, सिंघम हे दाक्षिणात्य चित्रपटांचेच रिमेक आहे.” अनेकांनी तर अजयला त्याच्या पान मसाल्याच्या जाहिरातींवरून देखील ट्रोल केले आहे. यावर एकाने लिहिले, “पान मसाल्याच्या जाहिरातींशिवाय अजयचे करिअर काहीच नाही.”

एका युजरने लिहिले आहे की, “कृपया अजय देवगणला कोणीतरी पाचवीचे सामान्यज्ञानचे पुस्तक द्या. कारण त्याचे अजूनही असेच मानने आहे की भारताला एक राष्ट्रभाषा आहे.” अजून एकाने एक फोटो पोस्ट करत एक तुलनाच केली आणि लिहिले, “पॅन इंडिया स्टार आणि पान मसाला स्टार.” तर अनेकांनी हा वाद थांबवा अजून वाढवू नका असे आवाहन केले आहे.

तत्पूर्वी दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपच्या ‘हिंदी आता राष्ट्रभाषा नाही” या व्यक्तव्यांनंतर अजय देवगणने त्याला उत्तर दिले होते. त्यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक ट्विटर वॉर चालू झाले आहे. यावर अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली असून, दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी किच्चा सुदीपला पाठिंबा देताना प्रश्न विचारला आहे की, “बॉलिवूडमधील कलाकार दाक्षिणात्य कलाकारांवर एवढे का जळत आहे आणि असुरक्षित जाणवून घेत आहे?”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post