Saturday, June 29, 2024

व्हिडिओ: जेव्हा अमिताभ बच्चन यांनी विराट कोहलीच्या फ्लाईंग किसबद्दल अनुष्काची केली थट्टा, ‘अशी’ होती अनुष्काची प्रतिक्रिया

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं फारच जुनं नातं आहे. ही दोन्हीही क्षेत्रे आपापल्या बाबतीत कमालीची प्रसिद्ध आहेत. या दोन क्षेत्रातून अशा अनेक जोड्या तयार झाल्या आहेत की, खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे सोबती बनले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या व्यावसायिक जीवनाव्यतिरिक्तही आपल्या रोमँटिक आयुष्यामुळे ते कायम चर्चेचा विषय असतात. दोघांचे व्हिडिओ आणि फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेव्हा विराट कोहली क्रिकेटच्या क्षेत्रात काही कमाल करतो, तेव्हा तो आपली पत्नी अनुष्का शर्माला नक्कीच फ्लाईंग किस देत असतो. ही गोष्ट कोणापासूनपणही लपलेली नाही. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनीसुद्धा या गोष्टीची चांगलीच दखल घेतली आहे.

तीन वर्षांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिग बी हे अनुष्का शर्माबरोबर याबद्दल विनोद करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे अनुष्का शर्मासोबत विराट कोहलीच्या फ्लाईंग किसची चेष्टा करताना दिसत आहेत.

अनुष्का शर्मा ही वरुण धवनसोबत त्यांच्या ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बी यांच्या शोमध्ये पोहोचली होती. त्यानंतर, बिग बींनी शोच्या इतर स्पर्धकाला विचारले की, तुम्ही क्रिकेट पाहतात का? यावर त्यांचे उत्तर होते की, ‘मी क्रिकेट पाहत नाही.’ त्यावेळी अमिताभ बच्चन असे म्हणतात की, ‘अनुष्का क्रिकेट बघते,’ तेव्हा ती महिला थोडी गोंधळलेली दिसते. मग अनुष्का त्यांना सांगते की, ‘माझा पती विराट कोहली एक क्रिकेटपटू आहे आणि, मी त्याच्यासाठी क्रिकेट बघते.’

यावर अमिताभ बच्चन हे अनुष्का शर्माची थट्टा करतात की, ‘फक्त त्यांना पाहायला.’ प्रत्युत्तरादाखल अनुष्का म्हणते की, ‘नाही साहेब, संघाला पाठिंबा देण्यासाठी, देशासाठी.’ तेवढ्यात अमिताभ बच्चन म्हणतात, ‘टीव्हीवर काय घडतं हे सर्वांनाच माहिती आहे.’ त्याचबरोबर बिग बी फ्लाईंग किस करताना विराटची आठवण करून देतात. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

जेव्हापासून अनुष्का शर्मा आई झाली आहे, तेव्हापासून ती मुलगी वामिकाबरोबर सर्वाधिक वेळ घालवत आहे. अनुष्काने तिच्या मुलीचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत, परंतु तिने चाहत्यांना मुलीचा चेहरा दाखवला नाही. यामागील एक कारण म्हणजे अनुष्का आणि तिचा पती विराट कोहली त्यांच्या मुलीला माध्यमांच्या भोवऱ्यात आणू इच्छित नाहीत. तसेच हे दोघेपण प्राणीप्रेमी असून बऱ्याचदा व्हिडिओ शेयर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यांनी रातोरात प्रसिद्ध झालेल्या अरिजित सिंगचा वर्षभरात मोडला होता सुखी संसार, वाचा त्याची कहाणी

-एक अभिनेता जोमात, तर दुसरा कोमात! वरुण धवनने मारली झोपलेल्या वरुण शर्माच्या अंगावर उडी, पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाथी कमिंग! भन्नाट डान्स करत अभिनेता संदिप पाठकने समाजाला दिला मोलाचा सल्ला

हे देखील वाचा