Wednesday, June 26, 2024

‘मी गायी-म्हशींसोबत काम…’, असे म्हणत शाहिदने दिले करीना कपूरसोबत पुन्हा काम करण्याच्या प्रश्नावर लक्षवेधी प्रत्युत्तर

बॉलिवूडच्या जगात नाती बनणे आणि बिघडणे ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु अशीही काही नाती आहेत ज्यांच्या तुटण्याने सर्वांनाच दु: ख झाले होते. असेच एक नाते करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांच्यातही होते. त्यांच्या तुटलेल्या नात्याची आठवण आजही काढली जाते. शाहिद आणि करीनाचे नाते कुणापासून लपलेले नाही. दोघांचेही उघडपणे एकमेकांवर प्रेम होते आणि जेव्हा त्यांचे संबंध तुटले, तेव्हा हे वृत्त मोठ्या प्रमाणात परसले होते.

करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचे प्रेम प्रकरण चालू होते, तेव्हा चाहत्यांना वाटले होते की लवकरच दोघांचे लग्न होईल. पण 2007 मध्ये आलेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, दोघांनीही आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला. असे म्हणतात की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून या नात्याला मान्यता नव्हती.

‘बेबो’शी ब्रेकअप झाल्यानंतर जेव्हा शाहिद कपूरला वेगवेगळ्या प्रसंगी त्याच्या तुटलेल्या हृदयाविषयी विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले की, “चांगला बॉयफ्रेंड असल्याचा दोष मी स्वतः ला देतो. मी साडेचार वर्ष त्या नात्यात होतो आणि खूप वचनबद्ध होतो. मी त्या नात्यातून बरेच काही शिकलो आहे आणि यासह मला असे वाटते की, मी कधीही चांगला प्रेमी होणार नाही.”

त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा शाहिदला करीनासोबत पुन्हा काम करण्याबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने लक्षवेधी प्रत्युुत्तर देत म्हटले की, “मला पुन्हा तिच्यासोबत काम करायला आवडेल.” तो पुढे म्हणाला, “अभिनेता म्हणून मला असे वाटते की, जर माझ्या निर्मात्याने मला गाय किंवा म्हशीसोबत रोमान्स करायला लावला, तर मी तेही करेल. कारण ते माझे काम आहे.”

शाहिद आणि करीनाने तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘फिदा’ आणि ‘चुपके चुपके’ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली, तर ‘जब वी मेट’ ब्लॉकबस्टर ठरला. मात्र, या रोमँटिक कॉमेडीच्या शूटिंगदरम्यान, त्यांच्या नात्यात कटुता आली.

करीना कपूरने अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत, तिच्या ब्रेकअपपासून ते सैफ अली खानसोबत लग्नापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. शाहिद कपूरशी झालेल्या ब्रेकअपबद्दल बोलताना करीना म्हणाली की, “नशिबाची स्वतःची योजना असते आणि त्यानुसार आयुष्य पुढे जात राहते. ‘जब वी मेट’चे शूटिंग ते ‘टशन’ चित्रपटापर्यंत असे खूप काही घडले, ज्यामुळे आम्ही आमचे मार्ग वेगळे केले.” करीनाच्या म्हणण्यानुसार, ‘जब वी मेट’ने तिचे करिअर बदलले, तर ‘टशन’च्या सेटवर सैफ अली खानशी झालेल्या भेटीने तिचे पूर्ण आयुष्य बदलले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ तेरी!’ अनुष्कानेे पती विराटला एकदा नव्हे, तर दोनदा उचलून दाखवली आपली ताकद, चाहत्यांनी म्हटले ‘शक्तिमान’

-‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

-मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

हे देखील वाचा