Wednesday, July 3, 2024

रणबीर कपूरला क्रिकेटचं वेड, टीम इंडियाला ‘अशा’ प्रकारे दिला शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटप्रेमींसाठी हा खूप खास काळ आहे, कारण देशात आयसीसी विश्वचषक सामने सुरू आहेत. भारताने आतापर्यंत आठ सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. टीम इंडियाची सेमीफायनलसाठीही निवड झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही टीम इंडियाला आपापल्या शैलीत सपोर्ट करत आहेत. रणबीर कपूरही टीमला चिअर-अप करताना दिसला आहे.

रणबीर कपूर हा क्रीडाप्रेमी आहे. अलीकडेच रणबीर कपूर टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसला. रणबीर शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर दिसला. यावेळी त्यांनी टीम इंडियाची जर्सी घातली होती. जर्सी परिधान करून रणबीर कपूरने वर्ल्ड कपसाठी (world cup 2023) टीम इंडियाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. रणबीर कपूरचा हा अवतार पाहता कदाचित तोही टीम इंडियाचा आगामी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊ शकतो, असे वाटते.

टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी (12 नोव्हेंबर 2023) नेदरलँड्ससोबत होणार आहे. तर, भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे, परंतु विरुद्ध संघ अद्याप निश्चित झालेला नाही. सध्या क्रिकेट चाहत्यांसोबतच बॉलिवूड सेलेब्सही टीम इंडियाला आपापल्या शैलीत सपोर्ट करत आहेत. दरम्यान ,रणबीर कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींनी आणि रणवीरच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

 अलीकडेच विकी कौशल टीम इंडियाचा वर्ल्डकप सामना पाहण्यासाठी गेला होता. तो त्याच्या आगामी ‘ सॅम बहादूर ‘ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेथे गेला होता. विकी कौशलचा आगामी चित्रपट ‘ अॅनिमल ‘ 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. रणबीरच्या आगामी ‘ अॅनिमल ‘ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, तो पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. ( bollywood world cup 2023 famous actor ranbir kapoor supports indian cricket team for world cup watch animal star video )

आधिक वाचा-
निळ्या रंगाच्या साडीवर जान्हवी कपूर हिचा झक्कास लूक, अभिनेत्रीच्या अदावर चाहते फिदा
अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास

हे देखील वाचा