Friday, December 8, 2023

हे काय बोलून गेला रणबीर कपूर ‘बॉलिवूडमध्ये आपलेपणा वाटत नाही’, खोटे वाटते तर वाचा ही बातमी

सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो सतत विविध शहरांमध्ये, विविध ठिकाणी, विविध शोमध्ये हजेरी लावून सिनेमाचे प्रमोशन करत आहे. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा हा सिनेमा लवकरच अर्थात ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यासाठी तो सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनचा एक भाग म्हणून रणबीर कपिल शर्मा शोमध्ये पोहचला होता. यावेळी त्याने आणि श्रद्धा कपूरने खूप मस्ती केली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांवर दिलखुलास गप्पा मारत उत्तरं दिली.

अशाच गप्पांमध्ये त्याने बॉलिवूडमध्ये झालेला बदल, बॉलिवूडचा आताच काळ याबाबत देखील त्याची मतं व्यक्त केली. तो म्हणाला आता त्याला हिंदी सिनेविश्वात आपलेपणा वाटत नाही. नुकताच रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आपलेपणा आणि एकता यावर बोलत आहे. रणबीर म्हणतो, “कदाचित आता बॉलिवूडमध्ये आपलेपणा राहिलेला नाही. येथे आधी सर्व सण एकत्र येऊन किंवा कोणाचा सिनेमा येत असेल हिट झाला असेल तर एकत्र येऊन एकमेकांसाठी साजरा केले जायचे. मात्र मला वाटते आता तो काळ राहिलेला नाही. जेव्हा सर्व एकमेकांना पाठिंबा दयायचे तो काळ मी आता मिस करतोय.

रणबीरच्या या मतावर बोलताना कपिल शर्मा म्हणतो, ‘योग्य आहे तुझे बोलणे’. रणबीरचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, यावर विविध कमेंट्स नेटकरी देताना दिसत आहे. सोबतच रणबीचे कौतुक देखील करत आहे. एकाने लिहिले,”खूपच योग्य आहे रणबीर तुझे, चित्रपटविश्व आधीसारखे एकत्रित नाही. हे निर्माता आणि दिग्दर्शकांमुळे झाले आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “शेवटचं आम्ही बॉलीवूडला एकत्र येताना पाहिले ते यश चोप्रा यांच्या ‘वीर जारा’च्या वेळी.” रणबीरला त्याच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा