नवीन वर्षाला सुरुवात झाली की लव्हबर्ड्स वाट पाहतात ते म्हणजे फक्त फेब्रुवारी महिन्याची. कारण फेब्रुवारी हा महिना व्हॅलेंटाईन मन्थ म्हणून साजरा केला जातो. १४ फेब्रुवारी हा दिवस त्यातून खासच आहे. कारण यादिवशी जणू काही प्रेमाची गुलाबी चादरच पसरलीय असं भासतं. व्हॅलेंटाईन मन्थमधील डेजसुद्धा ठरलेले असतात. जसं की रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे आणि असे अजून भरपूर आहेत बरं का. जे तुम्हाला माहितीही नसतील. रोज डे आणि चॉकलेट डे तर ठीक आहे, पण जर प्रपोजच केला नाही, तर व्हॅलेंटाईन डे कसा साजरा होणार.
कधीकधी या प्रयत्नात अपयशाला देखील सामोरं जावं लागतं, तर कधी पहिल्याच प्रयत्नात होकार सुद्धा मिळतो. शेवटी होकार मिळो किंवा नकार. प्रयत्न करणे आणि आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं असतं. पण मग प्रपोज करताना नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. अगदी बॉलिवूड कलाकारांपासून ते आपल्यासारख्या तरुण-तरुणींना. आज आपण जाणून घेणार आहोत बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडींच्या प्रपोजल्सबद्दल. ते ऐकून तुम्हालाही पुढच्या महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेसाठी आयडिया येतील.
यादीतील पहिली जोडी आहे बॉलीवूड इंडस्ट्रीतील नेहमीच चर्चेत असेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास. प्रियांकाच्या अभिनयानं तसेच तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालत असते. प्रियांका आणि निक यांची जोडी बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. ही जोडी जितकी सुंदर आहे, तितकीच सुंदर या जोडीची प्रपोजल स्टोरी आहे. प्रियांकाला प्रपोज करताना निक गुडघ्यावर बसला होता आणि त्याने म्हटले होते की, “तू जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. त्यामुळे तू माझ्याशी लग्न करून मला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवशील का?” यानंतर प्रियांकाने काय उत्तर दिलं असेल, हे तर तुम्हाला माहितंच असेल.
पुढील जोडी म्हणजे अभिषेक बच्चन (abhishek bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन. (aishwarya rai bachchan) आजही ही जोडी बॉलिवूडच्या सर्वोत्तम जोडींपैकी एक म्हणून ओळखली जाते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी २००६ मध्ये ‘उमराव जान’ या सिनेमात एकत्र काम केले होते. याच चित्रपटातून त्यांची जवळीक वाढली. पुढे मुलाखतीदरम्यान अभिषेकनं सांगितलं होतं की, आम्ही दोघे न्यूयॉर्कमध्ये ‘गुरू’ चित्रपटाची शूटिंग करत होतो. मी एके दिवशी हॉटेल रूमच्या मोठ्या खोलीत उभा होतो आणि विचार करत होतो की, जेव्हा आम्ही दोघेही लग्न करून सोबत असू, तेव्हा तो दिवस किती चांगला असेल. त्यानंतर आम्ही वर्षभर गुरू प्रीमियरसाठी तिथे गेलो. प्रीमियरनंंतर आम्ही पुन्हा त्याच हॉटेलमध्ये गेलो आणि त्याच बालकनीत मी ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं.” आता सौंदर्याची खाण असणाऱ्या ऐश्वर्याचे उत्तर ऐकून अभिषेक किती खुश झाला असेल, याचा विचार करा.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खाननं (saif ali khan) उत्तम अभिनय शैलीमुळे वेगळं नाव निर्माण केलं. गंभीर, विनोदी अशा अनेक भूमिका त्याने साकारलेल्या सैफनंन२०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत (kareena kapoor) लग्नगाठ बांधली. ‘टशन’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करीना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ‘कुरबान’ चित्रपटातही दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्यानं पॅरिसमध्येच करीनाला प्रपोज केले होते. पहिल्यांदा सैफनं पॅरिसच्या रिट्स हॉटेलमध्ये करीनाला प्रपोज केले होते. परंतु करीनाने त्याचं प्रपोजल नाकारलं. त्यानंतर मात्र दुसऱ्यांदा सैफनं करीनाला त्याच जागेवर प्रपोज केलं, जिथे त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी सैफची आई शर्मिला यांना प्रपोज केलं होतं. यानंतर सैफ आणि करीनाने आपला संसार थाटला.
आयुष्मान खुरानानं (ayushman khurana) सिनेसृष्टीत ‘विक्की डोनर’ या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानं दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. आयुष्मानच्या पत्नीचं नाव ताहिरा कश्यप. (tahira kashyap) ताहिरा ही एक लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. एक लोकप्रिय जोडी म्हणून आयुष्मान-ताहिराकडे पाहिलं जातं. कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडीनं काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे.आयुषमान हा लाजाळू स्वभावाचा होता. परंतु तरीही त्यानं ताहिराला कँडल लाईट डिनर डेटवर नेत प्रपोज केलं होतं. आज ही जोडी सुखात वैवाहिक आयुष्य जगत आहे.
यादीतील शेवटची जोडी म्हणजे बिपाशा बासू (bipasha basu) आणि करण सिंग ग्रोवर. (karan sing grover) प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा आणि अभिनेता करणची भेट ‘अलोन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. दोघेही थायलंडला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. तिथे ३१ डिसेंबरला करणनं बिपाशाला अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. करण तब्बल १० मिनिटे गुडघ्यावर बसला होता त्यावेळी बिपाशा म्हणाली होती, ‘काय झालंय तुला? तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे?’ त्यानंतर शेवटी बिपाशाने करणचे प्रपोजल स्वीकारलं होतं.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील राधिका आता दिसणार नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत, प्रोमो व्हायरल
…म्हणून ‘शमशेरा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणबीर कपूर मनातल्या मनात दिग्दर्शकाला द्यायचा शिव्या
पहिल्याच सीनने पर्ल व्ही पुरीने मिळवले होते प्रेक्षकांच्या मनात स्थान, ‘त्या’ एक चुकीने सगळं बिघडलं