Monday, February 26, 2024

बाॅलिवूडचे कलाकार आयोध्येला रवाना, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उत्साहीत

आज 22 जानेवारीला श्रीरामच्या अयोध्यानगरीत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने राममंदिर ट्रस्टने खुप मोठ्या भव्यदिव्य अशा सोहळ्याचं आयोजन केलं आहे. आणि हा उत्साह फक्त आयोध्येपुरताच मर्यादीत राहीलेला नसुन, आज संपूर्ण देश राममाय झाला आहे. सर्वत्र लोक रामभक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत .याला अगदी बाॅलिवूडचे मोठमोठे कलाकारदेखील अपवाद नाहीत. बॉलीवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी आज अयोध्येत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. काही सेलिब्रिटी आधीच अयोध्यानगरीत पोहोचले आहेत तर काही आज पोहोचणार आहेत. 90 दशकातील महानायक आणि आजही बाॅलिवूडचे बिग बी म्हणुन ओळखले जाणारे अमिताभ बच्चन(amitabh bhachchan) देखील आज रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येला रवाना झाले आहेत.

आज संपूर्ण देश रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या उत्साहात आहे. बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणार आहेत, ज्यात अमिताभ बच्चन यांचेही नाव आहेच. आज सकाळी अमिताभ बच्चन पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून अयोध्येला जाण्यासाठी निघाले असून. यासोबतच त्यांनी गळ्यात मफलर देखील घातला होता.

अमिताभ बच्चन व्यतिरिक्त कतरिना कैफ-विकी कौशल(vicky-katrina), आलिया भट्ट-रणबीर कपूर(ranbir -alia) या जोड्याही आज आयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. तसेच जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक सेलिब्रिटी विमानतळावर अयोध्येला रवाना होताना दिसले. यावेळी सर्व सेलिब्रिटी रामलल्लाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसले. हे सर्व स्टार्स पारंपारिक लूकमध्ये एअरपोर्टवर स्पाॅट झाले. या पारंपारिक वेशभुषेत सर्वच सेलिब्रिटी खूप छान दिसत आहेत.

दरम्यान मुकेश अंबानी(mukesh Ambani) यांच्या घरालाही प्रभू श्रीरामांच्या नावाने सजवण्यात आले आहे. अँटिलियामध्ये ‘जय श्रीराम’ च्या आकारात रोशनाई करण्यात आली आहे. यातुनच संपूर्ण अंबानी कुटुंबही रामभक्तीत तल्लीन झाल्याचं दिसत आहे. राम मंदिराच्या(ram mandir) अभिषेक सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर रिलायन्सतर्फे आज, सोमवार, २२ जानेवारी रोजी अँटिलिया येथे भव्य महाप्रसाददेखील आयोजित करण्यात आला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पूर्व पत्नीसोबत रोड ट्रिपचा आनंद घेताना दिसला आमिर खान, किरण रावने फोटो शेअर करून दाखवली झलक
पीएम मोदींनी केले ‘जय श्री राम’ भजनाचे कौतुक, गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली कृतज्ञता

हे देखील वाचा