Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड इशिता दत्ताच पती वत्सलसाेबतचा ‘ताे’ राेमॅंटिक व्हिडिओ व्हायरल, किस करताना दिसला अभिनेता

इशिता दत्ताच पती वत्सलसाेबतचा ‘ताे’ राेमॅंटिक व्हिडिओ व्हायरल, किस करताना दिसला अभिनेता

छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींच्या घरी लवकरच छोटे पाहुणे येणार आहेत. अशात टीव्ही अभिनेत्री इशिता दत्ता देखील त्या भाग्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे. खरे तर, इशा लवकरच आई हाेणार आहे. अभिनेत्री तिच्या प्रेग्नंसीतील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. यासाेबतच तिचा नवरा वत्सल शेठ देखील आपल्या लेडीलव्हवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात या जाेडप्याने लेटेस्ट फाेटाेशूट शेअर केले आहे, जे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

इशिता दत्ता (ishita dutta) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पती वत्सलसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. मॅटर्निटी शूटमध्ये इशिता बार्बी डॉलसारखी दिसत आहे. कारण, अभिनेत्रीने व्हाइट डिटेलिंग असलेला ट्रेल गाउन घातला होता. यासाेबतच अभिनेत्रीचे कानातले, खुले केस आणि कमीतकमी मेकअप तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घालत आहेत. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लाे तिच्या प्रेग्नसीचा आनंद सांगत आहे.

त्याचसाेबत वत्सल सेठनेही व्हिडिओमध्ये मॅचिंग कलरचा सूट-पँट परिधान केलेला दिसत आहे. हाेणारे आई-वडील एकमेकांसोबत कसे रोमँटिक होत आहेत, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कधी वत्सल आपल्या प्रेग्नंट बायकोच्या बेबी बंपला प्रेमाने स्पर्श करत आहे, तर कधी ताे कपाळावर चुंबन घेऊन रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत इशिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

इशिता दत्ता शेवटची ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. इशिताने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. इशिता आणि वत्सल यांचे 2017 साली लग्न झाले आणि आता दोघेही आई-वडील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत.( Bolywood actress ishita dutta maternity photoshoot husband vatsal sheth kissed her watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री झरीन खानचे वजन झाले होते 113 किलो, असा आहे अभिनेत्रीचा ‘फॅट टू फिट’ प्रवास

सलमानने ‘या’ कारणास्त ममता बॅनर्जींची घेतली भेट, मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाल्या, ‘कला, समाज अन्…’

हे देखील वाचा