मुंबई हायकोर्टाने (High Court of Bombay)’द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'(The Indrani Mukerjea Story) सिरीजच्या स्क्रीनिंगला स्थगिती देत नेटफ्लिक्सला(Netflix) मोठा धक्का दिला आहे. हा निर्णय सीबीआयच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सिरीज २३ फेब्रुवारीला रिलीज होणार होती. आता नेटफ्लिक्सला उच्च न्यायालय, सीबीआय अधिकारी आणि वकिलांसाठी या सिरीजचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याची सूचना देण्यात आली आहे.
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरिड ट्रुथ’ (The Indrani Mukerjea Story) या माहितीपटाला स्थगिती देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी उच्च न्यायालयात (High Court of Bombay)धाव घेतली होती. सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुष देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
Bombay HC has asked Netflix to stop screening of the web series on Indrani Mukerjea. The series was scheduled to be released tomorrow and the court has asked it to be stopped, the next hearing will be on Thursday (Feb 29)…Netflix has been asked to arrange a special screening…
— ANI (@ANI) February 22, 2024
त्यावेळी, सीबीआयच्या (CBI)अधिकाऱ्यांना माहितीपट का दाखवण्यात येत नाही ? त्यांना तो दाखवल्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा न्यायालयाने नेटफ्लिक्सला केली. त्यावर, सीबीआयला माहितीपट दाखवण्यात आला तर प्रदर्शनापूर्वीच त्याला कात्री लावली जाईल. शिवाय, सीबीआय शेवटच्या क्षणी न्यायालयात दाद कशी मगू शकते ? असा प्रश्न नेटफ्लिक्सच्या वतीने वरिष्ठ वकील रवी कदम यांनी उपस्थित केला.
न्यायालयाने त्याच्याशी असहमती दर्शवली. तसेच, आरोपीप्रमाणे तपास यंत्रणा आणि साक्षीदारांनाही अधिकार असतात. त्यामुळे, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना माहितीपट पाहण्याची संधी दिली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. त्याचवेळी, माहितीपटाचे प्रदर्शन एका आठवड्याने पुढे ढकलले तर आभाळ कोसळणार नाही, असेही सुनावल्यावर, माहितीपट २९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शित केला जाणार नाही, अशी हमी नेटफ्लिक्सतर्फे न्यायालयाला देण्यात आली.
Shaitaan Trailer Out: राक्षस घरी येणार अन्….’शैतान’चा ट्रेलर रिलीज
राहुल गांधींना बिग बींचे सडेतोड उत्तर?, ‘त्या’ विधानानंतर अमिताभ यांची पोस्ट चर्चेत